पुणे -मंडई परिसरातील प्रसिद्ध शारदा गणेश मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरात घुसलेल्या चोरट्यांनी 20 ते 25 तोळे सोन्याचे दागिने अन् रोख रक्कम चोरून गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शारदा गणेश मंडळ हे पुणे शहरातील प्रमुख मंडळापैकी एक गणेश मंडळ आहे. अनेक पुणेकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिरात चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -जामखेड ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात, गुन्हा दाखल
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मंदिरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. आज पहाटे जेव्हा काही नागरिक मंदिरात गेले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती. विश्रामबाग पोलिसांनी हे तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.