पुणे: कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन हा प्रकारअत्यंत संसर्गजन्य आणि चिंता वाढवणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे.जगातील विविध देशात वाढत असलेल्या ओमायक्रॉन च्या रुग्णांनी देशासह राज्यात देखील चिंता वाढली आहे.
प्रश्न - विविध देशांसह भारतात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहे.भीती व्यक्त केली जात आहे ?
- दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन च्या केसेस खूपच कमी होऊ लागल्या आहेत. साऊथ आफ्रिका आता ठिक आहे. भारत अमेरिके सारखे वागेल की साऊथ आफ्रिकेसारखे वागेल. तर साऊथ आफ्रिकेत नॅचरल इन्फेक्शन खूप होते.आणि व्हॅक्सीन कमी होते. 24 टक्केच लोकांनी 2 डोस घेतले होते.आपण जवळपास 50 ते 60 टक्के लोकांनी लस घेतली आहे.आपलं व्हाक्सीनेशन हे दक्षिण आफ्रिकेपेक्षा कितीतरी टक्के जास्त आहे.साऊथ आफ्रिकेने तीन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या फ्लाईट्स सुरू केल्या.आयसोलेशन कमी केल्या.केसेस कमी झाल्या. साऊथ आफ्रिका ज्या मार्गाने जाणार त्याच मार्गाने भारत जाणार.कदाचित हे भारतात येणार ही नाही.आले तरी पटकन जाईल.
प्रश्न :लोकांच्या मनात भीती आहे.तिसरी लाट येऊ शकते अस सांगितलं जातं आहे.मग असं का ?
-त्याला मी 2 गोष्टी सांगेल एक म्हणजे हे लोक जी भीती व्यक्त करत आहे.त्यांना फक्त एकच नम्रपणे तुच्छ प्रश्न विचारा की त्यांनी सप्टेंबरमध्ये काय होईल हे सांगितले होते.एप्रिल मे मध्ये हाहाकार माजला होता.आणि तेव्हा यांनी सांगितलं होते की सप्टेंबरमध्ये डेल्टाची तिसरी लाट येणार..5 लाख केसेस होणार..5 हजार लोक मरणार.ते आत्ता ज्या तिसऱ्या लाटेचे फेब्रुवारीत सांगताय त्याचे सोडा सप्टेंबरमध्ये काय सांगितलं होते त्यांनी ते बरोबर झाले की चूक. दुसरी डब्ल्यूएचओ म्हणतेय की वाढणार अमेरिकेत केसेस वाढल्या पण हॉस्पिटलायजेशन फक्त 8 टक्क्यांनी वाढले.केसेस जवळपास 70 टक्क्यांनी झाल्या.मी कधीच सांगितलं होते की ओमायक्रॉन भारताची बूस्टर आणि आफ्रिकेची व्हाक्सीन होईल.आणि सगळे संपून जाईल.आपण ओमायक्रॉन ला थांबू शकत नाही. डेल्टाच्या 6 पटीने असेल तर काँट्रॅक ट्रेसिंग शक्यच नाही.तुमचं एफल्ट ज्या गोष्टींवर तुम्हाला मदत होईल त्यावर अवलंबून पाहिजे.आपण साऊथ आफ्रिकेच्याच मार्गाने जाणार आहोत म्हणून भारतात ओमायक्रॉनची तिसरी लाट येणार नाही.काळजी करू नका..
प्रश्न: ओमायक्रॉन सह कोरोनाचे रुग्ण देखील वाढत आहे ?
- पूर्वी जस दुसऱ्या लाटेच्या वेळी बेड मिळत नाहीये.ऑक्सिजन मिळत नाही.असे काही ऐकाला येत आहे का? आत्ता नाही ना लाट, ती हॉस्पिटलायजेशनमुळे बनते.त्यामुळे आत्ता केसेस मोजून रिपोर्ट बनवणे बंद करा.फक्त हॉस्पिटलायजेशन सांगा.ते वाढायला लागले की काळजी करायची,नाही वाढायला लागले की उत्तमच आहे.ओमायक्रोन चे 550 रुग्ण आहेत.त्यातील किती लोकांना लक्षण आहे.70 टक्के रुग्णांना काहीच लक्षण नाही.त्यातून काय निष्पन्न होते .जर एवढा खतरनाक आहे तर मग 500 चे 5000 झाले असते.
प्रश्न: बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणाबाबत जो निर्णय झाला आहे त्याकडे कसं बघता ?
- काम छानच केले आहे.माझे फक्त एवढे म्हणणे आहे की वेळ नका लावू. ते आत्ता एका तोंडाने सांगत आहे की ओमायक्रॉन ची लाट येईल.ऑक्सिजन चा साठा काय जमवताय.बेड काय म्हणताय.ओमायक्रॉन ची जर एवढी भीती वाटत आहे तर मग आत्ता बूस्टरसाठी 10 जानेवारी का? आज 27 डिसेंबर आहे ना त्या 13 दिवसात 13 वा करून टाका ना. कशाला 13 दिवस थांबायचं.चालू करा आज लोकांच्या हातात सुया घुसू द्या. मुलांना 3 जानेवारीका स्पष्ट करून टाका बूस्टर डोस 270 दिवसांनी देणार म्हणे का 170 दिवसात देऊन टाका ना.कुठला देणार मिक्सरमॅच? कोव्हाक्सींन वाल्यानं कोव्हीशिल्ड कोव्हीशिल्ड वाल्यानं कोव्हाक्सींन सगळं कन्फ्युजन नको.
हेही पहा :Wave Of Omicron :- ओमायक्रॉन ची तिसरी लाट येणारच नाही...डॉ.रवी गोडसे