महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात, लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी - कोरोना लसीकरण

पुण्यात महापालिकेच्या रुग्णालयात ही लस घेण्यासाठी नागरिकांनी आज मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 ते 49 वर्षे वयोगटातील विशिष्ट आजार झालेल्या नागरिकांना आजपासून कोविडची लस देण्यात येत आहे.

third phase of corona vaccination
third phase of corona vaccination

By

Published : Mar 1, 2021, 5:16 PM IST

Updated : Mar 1, 2021, 5:26 PM IST

पुणे - सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा मार्ग आजपासून मोकळा झाला आहे. पुण्यात महापालिकेच्या रुग्णालयात ही लस घेण्यासाठी नागरिकांनी आज मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 ते 49 वर्षे वयोगटातील विशिष्ट आजार झालेल्या नागरिकांना आजपासून कोविडची लस देण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ही लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

याआधी पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना तर दुसऱ्या टप्प्यात कोरोना काळात रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली. त्यानंतर आजपासून कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झालाय. या टप्प्यात सात वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आणि 45 ते 49 वर्षे वयोगटातील विशिष्ट आजार झालेल्या लोकांना ही लस देण्यात येत आहे.

पुण्यात लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी
पुणे शहरातील महानगरपालिकेची दहा रुग्णालयात लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या लसीकरण केंद्रावर सर्वांना ही लस मोफत देण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात सकाळपासून 171 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. यावेळी बोलताना रुग्णालयातील डॉ. राजश्री पाटील म्हणाल्या, ज्या नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे अशा नागरिकांना या ठिकाणी आज लस देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त रुग्णालयातही कोविडची लस मिळवण्यासाठी नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळपासून मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येत आहेत आणि लस घेऊन जात आहेत.
Last Updated : Mar 1, 2021, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details