पुणे -पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठीची गटांची आरक्षण सोडत ( Zilla Parishad Reservation ) आज काढण्यात आली. या सोडतीमुळे अनेक दिग्गजांचे पत्ते कट तर अनेक नवीन तसेच महिलांना पुन्हा संधी मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ( Collector Dr. Rajesh Deshmukh ) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद निवडणूक ( Zilla Parishad Election ) शाखेचे समन्वयक व उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून विनायक राऊत आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाची मुदत २० मार्च २०२२ रोजी संपली आहे. तेव्हापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमण्यात आल् आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या ( OBC ) आरक्षणाबाबतचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने आतापर्यंत ही आरक्षण सोडत लांबणीवर पडली होती. अखेर आज ती पार पडली. या सोडतीमुळे जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा -Work in Marathi Language at Police Offices : मराठीतून कामकाज करा; पोलीस कार्यालयांना मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्देश
महिला सदस्यांची संख्या तीनने वाढली -आगामी पंचवार्षिक निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेवर एकूण ८२ सदस्य निवडून येणार आहेत. मावळत्या सभागृहात ही संख्या ७५ होती. त्यामुळे झेडपीच्या सदस्य संख्येत सातने वाढ झाली आहे. एकूण जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ( Sc ) ८, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ( ST ) ६ आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ( ओबीसी ) २२ जागा आरक्षित झाल्या आहेत. तर पुणे जिल्हा परिषदेतील एकूण जागांपैकी ४१ जागा (५० टक्के) या विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित ( Reserved for women ) झाल्या आहेत. यामुळे महिला सदस्यांची संख्या तीनने वाढली आहे. महिलांच्या एकूण जागांपैकी खुल्या गटातील महिलांसाठी २३, नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी ११, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी चार आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी तीन जागा राखीव झाल्या आहेत.
प्रवर्गनिहाय आरक्षण
एकूण जागा - ८२
विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव - ४१
खुला गट - ४६ (पैकी २३ महिला)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - २२ ( पैकी ११ महिला)
अनुसूचित जाती (एससी) - ०८ (पैकी चार महिला)
अनुसूचित जमाती (एसटी) - ०६ (पैकी तीन महिला)
हेही वाचा -Sushma Andhare joins Shiv Sena : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, सुषमा अंधारेंनी घेतले शिवबंधन हाती