पुणे -पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने कमी झाली आहे. दुसरी लाट जोमात असताना पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा १५ टक्क्यांच्या वर गेला होता. हा पॉझिटिव्हिटी रेट आता ४.९ टक्के इतका खाली आल्याने पुणेकरांवरील टांगती तलवार सध्या तरी हटली आहे.
२३९ नवे रुग्ण
गेल्या काही दिवसात शहरात नव्याने आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५००च्या खाली येत गेली. शुक्रवारी तर शहरात २३९ नवे रुग्ण आढळले तर ३६७ जण कोरोनातून बरे झाले. शहरात ऑक्सिजनवर असलेल्या, तसेच गंभीर रुग्णांची संख्यादेखील कमी झाली आहे. एप्रिल-मे मध्ये ५० हजारावर गेलेली शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३२०वर आली आहे. तर यातले पन्नास टक्क्यांपेक्षा ज्यास्त रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे.
अॅक्टिव्ह रुग्ण ३३२०