पिंपरी-चिंचवड -शहरातील भोसरी इंद्रायणी नगर येथे काका करत असलेल्या अश्लील त्रासाला कंटाळून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना सहा सप्टेंबर रोजी घडली होती. त्यानुसार, उशिरा तीन महिन्यानंतर मृत मुलीच्या आईने दिराविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
2018ला काकाकडे गेली होती संबंधित मुलगी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी 2018मध्ये औरंगाबाद येथे तिच्या काकांकडे राहण्यास गेली होती. त्यानंतर, म्हणजे ६ सप्टेंबर २०२० रोजी मृत मुलीच्या आईला तिच्या मित्राने तुमच्या मुलीला तिचा चुलता अश्लील मॅसेज करत असल्याचे सांगितल्याने हे प्रकरण उघडकीस आले.
अश्लील मॅसेज पाठवत असल्याचे मुलीने आईला सांगितले
तातडीने मुलीच्या बेडरूमध्ये तक्रारदार आई गेली, मुलीला याबद्दल विचारले असता होकार दिला आणि मोबाईलमध्ये अश्लील मसेजचे सर्व स्क्रीन शॉर्ट आहेत ते बघून घे, अे म्हटली. दरम्यान, अल्पवयीन मुलगी दुसऱ्या रूमच्या गॅलरीमध्ये गेली आणि तिथून उडी घेतली. हे सर्व पाहून फिर्यादी जागीच बेशुद्ध पडल्या.