पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षात नो कोरोना, आणि दारु नको दूध प्या, असा संदेश तरुणाईने दिला. नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे. याकरीता नववर्षाच्या पूर्वसंध्येला विविध सामाजिक संस्था आणि महाविद्यालयांतील तरुणाईने युथ अगेन्स्ट अॅडिक्शनचा संदेश दिला. कोरोना विषाणूच्या वेशातील कलाकारांनी नो कोरोना, आणि दारु नको, दूध प्या, असे म्हणत प्रबोधन केले आणि रस्त्यावर उतरुन लक्षणीय सहभाग घेत फलकांद्वारे जनजागृती करीत सरत्या वर्षाला निरोप दिला.
पुण्यात तरुणाईने 'दिला दारु नको, दूध प्या' संदेश - मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, कात्रज डेअरी आणि पुणे शहर पोलीस वाहतूक विभागातर्फे गुडकल चौकात नो कोरोना आणि दारु नको, दूध प्या , या कार्यक्रमांतर्गत जनजागृतीचे आयोजन करण्यात आले.
जनजागृती कार्यक्रम