महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंद्राने सरळ पुण्यासाठी लस पाठवली, महापौरांचा दावा.... - कोरोना लसीकरणा बद्दल बातमी

केंद्राने सरळ पुण्यासाठी लस पाठवल्याचा दावा महापौरांनी केला आहे. त्यांच्यावर विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ
महापौर मुरलीधर मोहोळ

By

Published : Apr 10, 2021, 4:31 PM IST

Updated : Apr 10, 2021, 4:57 PM IST

पुणे - राज्यात सध्या लसीकरण करताना अडचणी येत आहेत. लसीचा पूरवठा नसल्याने अनेक भागात लसीकरण थांबले आहे. कोरोनाचा मोठा संसर्ग झालेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यात देखील लसीचा तुटवडा आहे. पुणे शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून अनेक केंद्रावर लसीकरण बंद आहे. लसीच्या उपलब्धतेवरून सध्या राजकारण सुरू आहे. दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केंद्राने सरळ पुण्यासाठी लस पाठवल्याचे म्हटले आहे.

पुणे

केंद्राकडून लस उपलब्ध होत नसल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे भाजप कडून राज्यसरकारवर टीका होत आहे. त्यावरून पुन्हा आरोप प्रत्यारोप होत असून केंद्र सरकारकडून सरळ पुण्यासाठी खास लस पाठवण्यात आली आहे, असे सांगणाऱ्या पुण्याच्या महापौरांवर देखील विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांचे मानले आभार-

पुणे शहरासाठी रातोरात जवळपास अडीच लाख कोरोना लसीची व्यवस्था करण्यात आली. रविवारी आणखी सव्वालाख डोस पुण्यासाठी उपलब्ध होतील. कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर तातडीने लस पुरवठा केल्याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांचे आभार मानले होते.

महापौरांचा दावा फोल-

मात्र, ज्या 1 लाख लसी आल्या त्या पुणे जिल्ह्यासाठी आहेत. महत्त्वाचे म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यासाठीच नाही, तर इतरही जिल्ह्यांसाठी लसींचा पुरवठा करण्यात आला. सातारा जिल्ह्यासाठी 35 हजार, सोलापूर जिल्ह्यासाठी 17 हजार अशा प्रमाणात लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या लसी या पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागासाठीही राखीव असणार आहेत. लसीचा झालेला पुरवठा राज्य शासनाकडूनच करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे महापौरांचा दावा हा फोल असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टिका केली आहे.

हेही वाचा-राज्यात आठवडाभर लॉकडाऊन लागण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी बोलाविली सर्वपक्षीय बैठक

Last Updated : Apr 10, 2021, 4:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details