महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक..! पत्नीला मित्रांसोबत संबंध ठेवण्यास पतीने भाग पाडले, तिघांवर गुन्हा दाखल - तिघांवर गुन्हा दाखल

पतीने स्वतःच्याच पत्नीला आपल्या दोन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर हा आरोपी पती हा सर्व प्रकार समोर उभा राहून पाहत होता. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे

By

Published : May 18, 2022, 5:28 PM IST

पुणे - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबतच लाजिरवाणा प्रकार केला आहे. आरोपीने स्वतःच्याच पत्नीला आपल्या दोन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले ( Physical Relation with Friends ). एवढेच नाही तर हा आरोपी पती हा सर्व प्रकार समोर उभा राहून पाहत होता. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ( Bharati Vidyapeeth Police Station ) पती आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण -याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, आरोपी पती हा पत्नीला वारंवार मानसीक आणि शारीरिक त्रास देत होता. त्याचबरोबर दोनवेळा पत्नीची इच्छा नसताना ही 2020 आणि 2021 मध्ये हडपसर येथील एका लॉजवर आणि कोरेगाव येथील आपल्या मित्राच्या फ्लॅटवर आपल्या पत्नीला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. हे सर्व प्रकार घडत असताना तो दोन्ही वेळी स्वतः त्यांच्या समोर थांबून सगळ पाहत होता. सगळ्या प्रकरणानंतर आज (दि. 18 मे) तक्रारदार महिलेने आपल्या पतीविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर एकूण तिघांवर गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.

हेही वाचा -गुप्तांग कापून पत्नीने केली पतीची हत्या; शाहूवाडी तालुक्यातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details