महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Street Food : पुण्यातल्या 'या' हॉटेलमध्ये मिळतात तब्बल 20 प्रकारचे व्हेज-नॉनव्हेज समोसे

जंगली महाराज रोडवर असलेल्या एका 'द गोल्डन समोसा' (The Golden Samosa ) या हॉटेलमध्ये पुणेकर सद्या गर्दी करत आहेत. कारण येथे व्हेज-नॉनव्हेजसह चक्क 20 प्रकारचे ( Golden Samosa Menu ) समोसे मिळत आहेत.

Pune Street Food
Pune Street Food

By

Published : Jan 7, 2022, 9:57 PM IST

Updated : Jan 7, 2022, 10:42 PM IST

पुणे -पुण्यात खवय्यांसाठी अनेक मेजवान्या असतात. अगदी स्ट्रीट फूडपासून मोठ्या हॉटेलपर्यंत निरनिराळे पदार्थ पुण्यात मिळतात. तसेच पुणेकरदेखील या अनोख्या मेजवानीवर ताव मारण्यासाठी नेहमीच तयार असतात. असंच एक ठिकाण सध्या पुणेकरांच्या पसंतीला येत आहेत. जंगली महाराज रोडवर असलेल्या एका 'द गोल्डन समोसा' (The Golden Samosa ) या हॉटेलमध्ये पुणेकर सद्या गर्दी करत आहेत. कारण येथे व्हेज-नॉनव्हेजसह चक्क 20 प्रकारचे ( Golden Samosa Menu ) समोसे मिळत आहेत.

द गोल्डन समोसा हॉटेल

'या' हॉटेलमध्ये तब्बल 20 प्रकरारचे समोसे -

समोसा हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. भारतात कुठल्या ही भागात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला समोसा हा पदार्थ नक्की मिळेल. खरं तर नवव्या शतकापासून समोसा सगळीकडे चवीने खाल्ला जातो. मूळचा पर्शियातून तैयार झालेल्या समोस्याला भारतासोबत इजिप्त, लिबिया, दक्षिण आफ्रिका आणि मध्यपूर्वेच्या देशांमधे चांगली मागणी असते. समोसा म्हटलं तर डोळ्यासमोर एक सोपं चित्र येतं. बटाट्याचा भाजीच्या सारणापासून तळलेला गरमा गरम पदार्थ. पण शेवटी पुण्यातयाला देखील बगल भेटली. कारण समोसा म्हंट्ल की आपल्या डोळ्यासोर बटाट्याची भाजी, त्यासोबत मिर्ची सॉस आणि एखादी चटणी बस इतकच नॉर्मल चित्र डोळ्यासमोर येतं. पण पुण्यातील जंगली महाराज रोडवर असलेल्या या हॉटेलमध्ये तब्बल 20 प्रकरारचे समोसे मिळत आहेत.

या समोस्यांचा आहे समावेश-

पुण्यात सुरू झालेल्या 'द गोल्डन समोसा' या हॉटेलमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे २० समोसे मिळतात. ज्यात व्हेज समोसे, नॉनव्हेज समोसे त्याचबरोबर स्वीट समोसे इतकंच नाही, तर इथे चक्क उपवासाचे देखील समोसे खायला मिळतात. यासोबतच तुम्हाला या हॉटेलमध्ये मावा समोसा, पाव भाजी समोसा, चिकन खिमा समोसा, जैन समोसा, बटर चिकन समोसा आणि गाजर हलवा समोस्याचीदेखील चव चाखायला मिळते.

हेही वाचा - World record performance : दृष्टीहीन सायकलपटूची जनजागृतीसह विश्वविक्रमी कामगिरी

Last Updated : Jan 7, 2022, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details