महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेली तरुणी सुखरूप; अग्निशमन दलातील जवानांच्या प्रयत्नाला यश

पिंपरी-चिंचवड येथील फुगेवाडीत जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 15 वर्षीय मुलगी अडकली होती. या प्रकरणी अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तास अथक प्रयत्न करून तिला सुखरूप बाहेर काढले आहे. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. (पौर्णिमा संभाजी मडके वय- 15) असे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलीचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये जुनी इमारत कोसळली
पिंपरी-चिंचवडमध्ये जुनी इमारत कोसळली

By

Published : Aug 28, 2021, 7:40 PM IST

पुणे (पिंपरी-चिंचवड) - पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडीत जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 15 वर्षीय मुलगी अडकली होती. या प्रकरणी अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तास अथक प्रयत्न करून तिला सुखरूप बाहेर काढले आहे. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. (पौर्णिमा संभाजी मडके वय- 15) असे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान, मुलीला सुखरुप बाहेर काढल्याचा आनंद अग्निशमन दलाच्या जवानांच्या चेहऱ्यावर दिसत होता. तर, तीन तास ढिगाऱ्याखाली अडकल्याने घाबरलेल्या या मुलीला आश्रु अनावर होत होते.

इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेली तरुणी सुखरूप; अग्निशमन दलातील जवानांच्या प्रयत्नाला यश

मातीच्या व लाकडाच्या साह्याने बांधलेले घर

जय महाराष्ट्र चौक, फुगेवाडी येथे दु-मजली जुने घर पडले असून त्यामध्ये मुलगी अडकली आहे. अशी माहिती अग्निशमन दलास माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने हे पथक घटनास्थळी दाखल झाले. हे मातीच्या व लाकडाच्या साह्याने बांधलेले घर होते. त्याचा वरचा मजला खालच्या मजल्यावर पडला होता. जवानांनी अडचणींचा सामना करत बचाव कार्य सुरू केले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त इप्पर मंचक त्यांच्या पोलीस पथक उपस्थित होते. अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आणि प्रताप चव्हाण, तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिका अति-आयुक्त विकास ढाकणे देखील प्रशासकीय यंत्रणा नियंत्रित करण्यासाठी उपस्थित होते.

बचावकार्य सुमारे 3 तास सुरू होते

कुमारी पौर्णिमा उर्फ आशु संभाजी मडके वय -अंदाजे 14 वर्षे घरातील स्नान गृहात अंघोळ करत असल्याने, बहुदा तिला इमारत पडते वेळी त्वरित बाहेर पळता आले नाही. त्यामुळे ती अडकून पडली होती. बचाव कार्या दरम्यान आजू बाजूच्या भिंती आणि सदर इमारतीच्या समोरील मजला व भिंतीचा भाग ढिला होऊन पडत असल्याने अग्निशमन दलाचे जवान देखील अडकण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र, ही जोखीम पत्करून त्यांनी पौर्णिमाला सुखरुप बाहेर काढले. हे बचावकार्य सुमारे 3 तास सुरू होते. तसेच, अग्निशमन दलाचे एकूण 50 कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांनी मिळून ही कामगिरी पूर्ण केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details