महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पार पडली पुणे मनपाची सर्वसाधारण सभा - मनपा सर्वसाधारण सभा सोशल डिस्टन्स

एप्रिल आणि मे महिन्याची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे रद्द झाली होती. आज मात्र, जून महिन्याची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यासाठी 60 पेक्षा जास्त नगरसेवक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'सोशल डिस्टन्स' ठेवत पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली.

PMC General Meeting
मनपा सर्वसाधारण सभा

By

Published : Jun 17, 2020, 7:20 PM IST

पुणे -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 'सोशल डिस्टन्स' ठेवत पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. आपण मोठ्या संख्येने एकत्र जमलो आहोत. कोरोना संसर्गाच्यादृष्टीने हे धोक्याचे आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ एकत्र न थांबता चर्चा आटोपती घेतली पाहिजे, असे सांगत महापौरांनी चर्चा होऊ दिली नाही. क्षेत्रिय कार्यालयातील उपआयुक्त दर्जाचा अधिकारी तुम्हाला पाहिजे ती माहिती देईल, असेही महापौरांनी विरोधक नगरसेवकांना सांगितले. यावर विरोधक आक्रमक झाले. मात्र, यानंतर मतदान घेत सभा तहकुब करण्यात आली.

मनपाच्या सर्वसाधारण सभेत सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले

मागील दोन महिने गैरहजर राहणाऱ्या 98 नगरसेवकांचे पद धोक्यात आले होते. त्यामुळे या नगरसेवकांनी सभा सुरू होण्या अगोदर उपस्थितीची सही करण्यास प्राधान्य दिले. कोरोनाचा नगरसेवकांनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र दिसून आले. प्रत्येक जण एकमेकांना दुरूनच नमस्कार करत होते. सभागृहातदेखील कामकाजा दरम्यान मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.

महानगरपालिका सर्वसाधारण सभेसाठी दोघांच्या आसनावर एक जण, तिघांच्या आसनावर दोनजण आणि आवश्यकता भासल्यास काही अरिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. एप्रिल आणि मे महिन्याची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे रद्द झाली होती. आज मात्र, जून महिन्याची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यासाठी 60 पेक्षा जास्त नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला पुणे शहरातील कोरोना संकटाबाबत चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. शहरात दररोज जवळपास 300 रूग्ण आढळत आहेत. मात्र, त्याप्रमाणात उपाययोजना होत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कोरोनाचे संकट निवारण्यासाठी महानगरपालिका प्रशासन काय काम करत आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बराटे यांनी उपस्थित केला. चार महिन्यानंतर सर्वसाधारण सभा होत आहे मात्र, महानगरपालिका आयुक्त कुठे गायब आहेत? असा संतप्त सवाल नगरसेवक विशाल तांबे यांनी उपस्थित केला. गेल्या चार महिन्यात काय काय उपाययोजना केल्या, हे आयुक्तांनी सांगायला हवे. 125 कोटी रुपये खर्च करूनही कोरोनाचे संकट आटोक्यात आले नाही, असेही तांबे म्हणाले. आगामी काळात रूग्ण वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे काय उपाययोजना केल्या, याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details