महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजभवनातून पत्र गायब होणे हा महाराष्ट्राचा अपमान.. शिवसैनिकांच्यावतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

राजभवनातून कागदपत्रे गायब होतात आणि ते निर्ल्लजपणे मान्य केले जाते, हा महाराष्ट्र आणि महाराज या दोघांचा अपमान आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी शिवसेना पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे.

disappearance of the letter from Raj Bhavan
disappearance of the letter from Raj Bhavan

By

Published : May 25, 2021, 6:42 PM IST

Updated : May 25, 2021, 6:54 PM IST

पुणे - स्वराज्यातून गवताची एक काडी सुद्धा हरवता कामा नये, असा आदेश देणाऱ्या छत्रपतींच्या राज्यातून ते ही राजभवनातून कागदपत्रे गायब होतात आणि ते निर्ल्लजपणे मान्य केले जाते, हा महाराष्ट्र आणि महाराज या दोघांचा अपमान आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी शिवसेना पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे.

चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी -

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राज्यपाल यांना राजभवनात जाऊन सरकारच्या वतीने विधान परिषदेवर १२ सदस्यांची नियुक्ती करणेबाबत महाराष्ट्र राज्य सरकारमधील शिवसेना व मित्रपक्षांच्या (महाविकास आघाडी) वतीने १२ व्यक्तींच्या नावाची यादी राज्यपाल यांना देण्यात आली होती. मात्र इतर सर्व प्रसिद्धी माध्यमातून माहिती मिळाली, कि राज्यपालांना सुपूर्द केलेली यादी राजभवनमधून गहाळ झालेली आहे. याबाबत संपूर्ण माहिती जनतेला मिळणे अभिप्रेत आहे. तसेच राजभवन सारख्या महाराष्ट्र शासनाच्या अति महत्वाच्या वास्तूमधून अशा प्रकारे महत्वाची व गोपनीय माहिती गहाळ होणे ही अत्यंत दुदैवी, निंदनीय व लांछनीय बाब आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी केली.

राजभवनातून पत्र गायब होणे हा महाराष्ट्राचा अपमान
राजभवनातील सीसीटीव्ही तपासण्यात याव्यात -
राज्यपाल व राजभवन प्रशासनाकडून पोलिसांना कोणती माहिती व तक्रार मिळाली का? तसेच त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली आहे का? हि बाब सर्वापासून का लपवण्यात आली? तसेच गहाळ झालेल्या यादीची महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडे अधिकृतरीत्या परत मागणी करण्यात आली का? राजभवनातील सर्व सी.सी.टी.व्ही. फुटेज (CCTV) तपासून दरम्यानच्या काळात राज भवनात कोण आले कोण गेले, याचा शोध घेऊन योग्यरीत्या तपास करावा. या प्रकरणातील सर्व मुद्यांची सखोल चौकशी होणे न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे, असेही यावेळी मोरे म्हणाले. यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे शहर समन्वयक आनंद दवे यांनी हे निवेदन दिले.
Last Updated : May 25, 2021, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details