पुणे -शिंदे सरकारने ( Shinde Govt ) उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला असून, 2017 प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था ( Elections to local bodies ) , महापालिका निवडणुका ( Municipal elections ) होणार आहेत. या निर्णयानंतर आत्ता पुणे महापालिकेच्या निवडणुका ( Pune Municipal Corporation Elections ) देखील 4 च्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध ( NCP ) व्यक्त करण्यात येत आहे अशी, माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
निवडणुका ओबीसी आरक्षणमुळे लांबल्या -फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणमुळे लांबल्या आहेत. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे शहरासह राज्यातील विविध महापालिकांमध्ये प्रशासक काम करीत होते. मात्र, आता शिंदे सरकारने आज पुन्हा 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुका होणार आहेत असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.