महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Dog Story : विदेशी श्वानांची पुणेकरांमध्ये क्रेज, किंमत ऐकून व्हाल थक्क - Pune Dog Food Shop

पुणेकरांकडून पाच हजांपासून एक लाख किंमतीपर्यंत श्वान पाळण्यात येत आहेत. यापूर्वी महागड्या गाड्या, सायकली, मोबाईल या माध्यमातून पुणेकर आपली श्रीमंती दाखवत ( Pune People Craze Foreign Dogs ). त्यामध्ये आता महागड्या श्वानांची भर पडली आहे.

विदेशी श्वानची पुणेकरांमध्ये क्रेज
विदेशी श्वानची पुणेकरांमध्ये क्रेज

By

Published : Dec 29, 2021, 12:21 PM IST

पुणे : बोलण्याच्या ओघात 'पुणे तिथे काय उणे' असे नेहमी म्हटले जाते. पुण्यातील लोकांच्या हौसेला मोल नाही हे सातत्याने समोर आले आहे. महागड्या गाड्या, सायकली, मोबाईल या माध्यमातून पुणेकर आपली श्रीमंती दाखवत असतात. त्यात आता महागड्या श्वानप्रेमाची भर पडली आहे ( Pune People Craze Foreign Dogs ). पाच हजारांपासून 1 लाखांच्या किंमतींचे विदेशी श्वान पुणेकरांनी आपल्या डेरेदाखल केले आहे ( Pune Dogs Prices ).

विदेशी श्वान पाळण्याची क्रेझच न्यारी

इतिहासपूर्व कालखंडापासून मनुष्याच्या अगदी विश्वासातला प्राणी म्हणजे श्वान. शेती आणि शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या श्वानांचा उपयोग अलीकडे संरक्षण दलात पोलीस दलात होत आहे. मात्र, सध्या हौसेसाठी विदेशी श्वान पाळण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. जगभरात श्वानांच्या सुमारे चारशेहून अधिक तर देशात सुमारे शंभर जाती आहेत. त्यापैकी २० ते २५ जातीच्या श्वानांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

श्वानांची हौस, मौज आणि उपचार

टी-शर्ट, गॉगल, बूट या लोकांच्या हौसेच्या बाबी आहेत. मात्र, श्वानप्रेमी आपल्या टी- शर्ट, गॉगल परिधान करुन श्वानांना रस्त्यावर घेऊन फिरताना दिसत आहेत. तर, 25 टक्क्यांहून अधिक लोक श्वान प्रजनन व्यवसायात आहेत. श्वानांच्या उपचारासाठी पुण्यात 15 हून अधिक खासगी एअर कंडीशन्ड दवाखाने आहेत ( Pune Dogs Hospital ). बहुतांशी श्वान हे परदेशी असल्याने त्यांना लागणारे पूरक खाद्य हे परराज्यातून, परदेशातून आयात केले जाते. या खाद्य विक्रीची ३५ हून अधिक दुकाने पुणे परिसरात आहेत ( Pune Dog Food Shop ). महाग असणारे हे परदेशी श्वान हे बहुतांश उच्चभ्रू कुटुंबातील लोक हौसेसाठी पाळतात.

गुन्हांचा माग काढण्यासाठी श्वानांचा वापर

चोरी, घरफोडी, खून, खुनांच्या गंभीर गुन्हांसोबत अतिरेकी कारवायांत वाढ झाली आहे. या गुन्हांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाचा वापर पोलिसांकडून केला जात होता ( Police Uses Dogs Crime Investigation ). आता तपासयंत्रणा अद्ययावत झाल्या तरी श्वानपथकाचे महत्त्व किंचितही कमी झालेले नाही.

'या' श्वानांना अधिक मागणी

श्वानांच्या माध्यामातून एक नवीन व्यवसाय आता उदयास आला आहे. त्यात लॅब्रेडोर रिट्रीवर, गोल्डन रिट्रिव्हर, जर्मन शेफर्ड, साइबेरियन हस्की, ग्रेट डेन, रॉट विलर, पामेलियन डॉबरमॅन, सिंज्जू, पग या महागड्या श्वानांचा समावेश आहे. त्यांची किंमत कमीत कमी पाच हजार तर जास्तीत जास्त एक लाखांपर्यंत आहे, अशी माहिती श्वान विक्रेते जावेद पटेल यांनी दिली.

हेही वाचा -Omicron Test : ' ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय हे ओळखण्यासाठी ही टेस्ट करा

ABOUT THE AUTHOR

...view details