पुणे - बाबासाहेबांनी त्यावेळी काय सांगितले तर संकुचित वृत्ती सोडून आपण सर्वजण एका मार्गाने चालण्याचा विचार केला तर आपण या देशाला महान बनवू शकतो. (Union Minister Narayan Rane Mahaparinirvan Diwas 2021 ) आज देश त्याच मार्गाने चालला आहे. पण देशाला काही संकुचित वृत्ती त्या मार्गावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करतात. अस मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ( Devendra Fadnavis Mahaparinirvan Diwas 2021 ) ते पुण्यात महापरिनिर्वाण दिननिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शा. ब. मुजुमदार उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वस्तू वापरल्या. जी कपडे परिधान केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्तलिखित अशा सर्व गोष्टींचे दर्शन घेण्याची आज संधी मिळाली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासाची वेळोवेळी जुडण्याची संधी देखील मला मिळाली. मी मुख्यमंत्री असताना लंडनमधील बाबासाहेबांचे घर राज्य सरकारने वतीने विकत घेतले. केंद्र सरकारकडून मुंबईतील इंदु मीलसाठी मोफत जागा दिली.( Mahaparinirvan Diwas 2021 ) त्यावेळेस राज्य सरकारारने शंभर कोटी रुपये दिले. आता लवकरच बाबासाहेबांचे स्मारक पुर्ण होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.