महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भीमा-भामा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - नदीपात्र

कळमोडी,चासकमान व भामा-आसखेड या तीनही धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे भिमा व भामा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

भिमा व भामा

By

Published : Aug 4, 2019, 11:38 AM IST

Updated : Aug 4, 2019, 3:12 PM IST

पुणे- गेल्या पंधरा दिवसांपासून भीमा आणि भामा खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून मागील 24 तासात कळमोडी,चासकमान व भामा-आसखेड या तीनही धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे भीमा आणि भामा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नदीपात्रावर असणारे पुल पाण्याखाली गेले असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भिमा व भामा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

चासकमान धरणातून 45 हजार क्युसेकने भीमा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे तर भामा-आसखेड धरणातून 30 हजार क्युसेकने भामा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीपात्रावरील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांनी धोकादायक ठिकाणाहून प्रवास करू नये. तसेच पाण्यात न उतरण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.

पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर पुढील काळामध्ये नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Last Updated : Aug 4, 2019, 3:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details