पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. यंदा दोन वर्षानंतर बोर्डाची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये दडपण दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर परीक्षा होत असल्याने आणि 10 वी नंतर दोन वर्षे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने झाले असल्याने आज परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने दडपण आलं आहे. यंदा देखील 12 वीच्या परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने न होता ऑनलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजे, अशी भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. परीक्षेसाठी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली देखील करण्यात आली आहे आणि या नियमांचे काटेकोरपणे विद्यार्थ्यांना पालन करावे लागणार आहे.
12 th Class Exam : आजपासून 12 वीच्या ऑफलाइन परीक्षेला सुरूवात; विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना - आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर परीक्षा होत असल्याने आणि 10 वी नंतर दोन वर्षे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने झाले असल्याने आज परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने दडपण आलं आहे. यंदा देखील 12 वीच्या परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने न होता ऑनलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजे, अशी भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
![12 th Class Exam : आजपासून 12 वीच्या ऑफलाइन परीक्षेला सुरूवात; विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना 12 th Class Exam](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14633625-68-14633625-1646374695511.jpg)
गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे करण्यात आलं स्वागत -
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात झाली असून पुण्यातील राजीव गांधी ई-लर्निंग शाळेत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच परीक्षा कक्षात जात असताना विद्यार्थ्यांचे सॅनिटायझर तसेच थर्मामीटरने चेकिंग देखील करण्यात आली. दोन वर्षानंतर परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये दडपण येऊ नये म्हणून आज परीक्षेच्या आधीच मुलांना गुलाबपुष्प देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या पश्वभूमीवर दोन वर्षे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीनेच झाले असल्याने आता थेट परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने खूप दडपण आलं आहे. पेपर कसा जाईल याची चिंता वाटत आहे. ऑनलाईन पद्धतीने जितकं शिकवलं तितक अभ्यास तर पूर्ण झालं आहे. एक चांगल वाटत आहे की परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होत आहे तर दुसरीकडे टेन्शन देखील आलं आहे. बोर्डाने आमची मानसिकता तयार केली आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी पण आमची तर हीच इच्छा होती की परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजे होत्या असे देखील यावेळी विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.