पुणे : गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीच प्रकरण हे राज्यभर गाजत आहे.TET पेपर फुटी प्रकरण असेल किंवा आरोग्य भरती पेपर फुटीच प्रकरण असेल पुणे पोलीस आता साऱ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणत आरोपींना अटक करताना दिसत आहेत. आज पुणे सायबर पोलिसांनी ( Pune Cyber Police ) टीइटी प्रकरणातील 3955 पानाचं दोषारोपपत्र ( TET Scam Chargesheet Filled ) पुणे जिल्हा सत्र न्यायालयात ( Pune District Session Court ) दाखल केल आहे.
TET Scam Chargesheet Filled : टीईटी घोटाळा प्रकरणात तीन हजार 955 पानांचं दोषारोपपत्र दाखल - टीईटी घोटाळा प्रकरणात दोषारोपपत्र दाखल
टीईटी घोटाळ्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी ( Pune Cyber Police ) ३ हजार ९५५ पानांचं दोषारोपपत्र आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात ( Pune District Session Court ) दाखल केलं ( TET Scam Chargesheet Filled ) आहे. याप्रकरणी १५ आरोपी हे अटकेत असून, १२ आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत.
टीईटी घोटाळा प्रकरणात तीन हजार 955 पानाचे दोषारोपपत्र दाखल
दोषारोपपत्रात वाढ होणार
टीईटी प्रकरणात आत्तापर्यंत 15 आरोपींना अटक केली असून, सुशील खोडवेकर ,प्रितेश देशमुख , तुकाराम सुपे , सुखदेव ढेरे यांचा समावेश आहे. तर याच प्रकरणातील 12 आरोपी अजून फरार आहेत. त्यांचाही शोध पुणे पोलीस घेत आहेत. यातील दोषारोपपत्र आज दाखल केल असून, राहिलेल्या आरोपींना अटक केल्यानंतर या दोषारोपपत्रात अजून वाढ होईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय.