महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

TET Exam Scam : निलंबित आयुक्त तुकाराम सुपेंकडे पुन्हा सापडले घबाड.. २५ लाखांची रोकड हस्तगत - Pune Cyber Police

शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी ( TET Exam Scam ) पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे ( Maharashtra State Council of Examination ) निलंबित आयुक्त तुकाराम सुपेंकडून २५ लाखांची रोकड हस्तगत ( 25 lakh cash seized Tukaram Supe ) केली आहे. दररोज इतक्या मोठ्या प्रमाणावर घबाड मिळून येत असल्याने घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

तुकाराम सुपे
तुकाराम सुपे

By

Published : Dec 23, 2021, 7:34 PM IST

पुणे- टीईटी परीक्षा पेपरफुटीत ( TET Exam Paper Leak ) अटक करण्यात आलेल्या परीक्षा परिषदेचे ( Maharashtra State Council of Examination ) आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडून आज पून्हा 25 लाख रुपये हस्तगत करण्यात आले ( 25 lakh cash seized Tukaram Supe ) आहेत. आतापर्यंत सुपे यांच्याकडून 2 कोटी 83 लाख रुपये हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती सायबर पोलिसांनी ( Pune Cyber Police ) दिली.

काल एका व्यक्तीने आणून दिले 10 लाख

परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे यांनी एका व्यक्तीला दिलेले 10 लाख रुपये त्या व्यक्तीने स्वतः हा काल सायबर पोलिसांकडे आणून दिले आहेत. ज्या व्यक्तीकडे सुपे यांनी पैसे ठेवले होते त्याच व्यक्तीने स्वतःहून 10 लाख रुपये सायबर पोलिसांकडे आणून दिले.

एकूण 2 कोटी 83 लाख रुपये हस्तगत

शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरावर दुसऱ्यांदा धाड टाकली. त्यात पोलिसांनी जवळपास दोन कोटींचं घबाड जप्त केलंय. सुपेंच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती मिळतेय. याआधी झालेल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागला. काल एका व्यक्तीने दहा लाख रुपये आणून दिले. आज पुन्हा 25 लाख दिल्याने एकूण 2 कोटी 83 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details