महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 7, 2022, 7:45 PM IST

ETV Bharat / city

Sinhadgad Fort : पराक्रमाची साक्ष देणारा आणि निसर्गातून स्फूर्ती देणारा 'सिंहगड'

सिंहगड किल्ला पुणे जिल्ह्यात ( Sinhagad Fort Pune District ) हवेली तालुक्यात डोणजे या गावात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील सर्वात पुण्याच्या जवळचा किल्ला जो आहे, तो सिंहगड किल्ला ( Sinhadgad Fort ).

Sinhadgad Fort
Sinhadgad Fort

पुणे - सिंहगड किल्ला पुणे जिल्ह्यात ( Sinhagad Fort Pune District ) हवेली तालुक्यात डोणजे या गावात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील सर्वात पुण्याच्या जवळचा किल्ला जो आहे, तो सिंहगड किल्ला. पूर्वी कोंढाणा नावाने ओळखला जाणाऱ्या या किल्ल्यावर तानाजी मालुसरे ( Tanaji Malusure ) यांनी स्वारी केले अन् त्यांना प्राण गमवावे लागले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ( Chhatrapati Shivaji Maharaj ) 'गड आला पण सिंह गेला', असे शब्द काढले. तेव्हापासून या किल्ल्याला 'सिंहगड' ( Sinhadgad Fort ) असं देण्यात आलं.



'...म्हणून पुणे दरवाजे' -सिंहगडामध्ये प्रवेश करण्यासाठी पुणे दरवाजातून जावं लागतं. पुणे दरवाजा संपल्यानंतर असेच पुढे दोन दरवाजे आहेत. परंतु, दुसऱ्या आणि तिसऱ्या धर्माचे काही ऐतिहासिक असं काही नाही. हे जे सिंहगडाची दरवाजे आहेत, ते मोठे तटबंदी असून शत्रूंना सहजासहजी किल्ल्याची श्रद्धा येऊ नये, त्यासाठी याची बांधणी केली आहे. पुण्याकडून येणारे लोकांसाठी हे दरवाजे असल्यामुळे या दरवाजांना पुणे दरवाजे असे म्हटले जाते.

आजही तोफखाना वास्तू मजबूत - सिंहगडाच्या दुसऱ्या दरवाजाच्या मध्ये गेल्यानंतर थोड्याच अंतरावर तोफखाना आहे. याच तोफखान्यामध्ये दारूगोळा ठेवला जायचा. या तोफखान्याला चारी बाजूने रस्ते आहेत, कारण शत्रू कुठूनही आला तर आपली चारू बाजूने आक्रमण करता यावे. आजही ही तोफखाना वास्तू मजबूतपणे उभे असल्याचे दिसते.

घोड्यापांगमध्ये पाण्याची साठवण - त्यानंतर सिंहगडाच्या थोडं पुढे गेल्यानंतर पाण्याचे टाके आहेत. त्याकाळी दुष्काळ पडल्यानंतर किंवा उन्हाळ्यामध्ये गडावर राहणाऱ्या लोकांसाठी पाण्याची सोय व्हावी, म्हणून हे घोड्यापांग यामध्ये पाण्याची साठवण करण्यात येत होती. त्यामुळे हे घोडेपांगे सुद्धा त्या काळातला एक वास्तू रचनेचा सुंदर नमुना उदाहरण आहे.

तानाजी मालुसरे यांची समाधी -त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर सिंहगडाची ओळख ज्यांच्या पराक्रमावर सांगितली जाते, ते सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. या ठिकाणी त्यांचे समाधीचे आता साईडला बाजूला एक ब्रांझचा पुतळा आहे. या ठिकाणी सुंदर असं गार्डन तयार करण्यात आलेल्या. येथे युद्धाची जी स्थिती असते, ती उभी करण्यात आलेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी त्या ठिकाणी बसण्याची सुद्धा सोय आहे. प्रत्येक जण या समाधीवर नतमस्तक होऊनच पुन्हा किल्ल्याचे मार्ग क्रमण करत असतो.

उमटूनगिरीचा कडा -येथून पुढे गेल्यावर लोक तानाजी कडावर जातात. ज्याला उमटूनगिरीचा कडा म्हणलं जातं. त्याच ठिकाणाहून तानाजी मालुसरे आणि त्यांचे साथीदार हे किल्ल्यावरती आले होते. घोरपडीच्या सहाय्याने ते येथून आल्याची माहिती सांगितली जाते. त्यामुळे त्याला तानाजी कडा, असेही म्हटलं जाते.

कलावंतीनेचा बुरुज -त्याच बाजूने पुढे गेल्यानंतर कलावंतीनेचा बुरुज आहे. ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे आणि उदयसिंग भान राजपूत यांच्यामध्ये लढाई झाली. येथेच तानाजी मालुसरे यांनी उदयसिंह भान राजपूतला लढाई करत स्वत: धारातीर्थी पडले.

छत्रपती राजाराम महाराज समाधी - त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. या अकरा वर्ष मोगलीशी संघर्ष करत छत्रपती राजाराम महाराज यांनी आपलं आयुष्य घालवलं. अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांचे निधन झालं. त्यांची सुंदर अशी समाधी या सिंहगडावर पाहायला मिळते.

कल्याण दरवाजा - पुढील बाजूला आपल्याला दिसतो तो कल्याण दरवाजा याच कल्याण दरवाजा. त्या कल्याण दरवाजाच्या आतमधून प्रवेश केल्यानंतर वरच्या टेकडीवर उदयभान राजपूत याची समाधी आहे. कल्याण दरवाजा हा कल्याण गावातून येत असल्यामुळे त्याला कल्याण दरवाजा हे नाव पडलेले आहे. या किल्ल्यावर जसा स्वतंत्र पूर्वी इतिहास आहे तसा स्वातंत्र्याचा सुद्धा इतिहास आहे याच किल्ल्यावर टिळक वाडा म्हणून एक वास्तू आहे. ज्या ठिकाणी लोकमान्य टिळक आले की थांबायचे, असे म्हटले जाते. आजही या ठिकाणी हा वाडा चांगल्या स्थितीत दिसतो.

गडावर कोंढाणेश्वर अमृतेश्वर मंदिर आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी महादेव कोळी समाजाचे जे लोक आहेत. त्यांची थोडीशी घर आहेत. तेच लोक या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करतात. सिंहगडावर पर्यटनासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक रोज येत असतात. त्यानेही हे निसर्गाचे सौंदर्य इतके सुंदर आहे की आपण त्याची कल्पना करू शकत नाही, असे पर्यटक सांगतात. तसेच, सिंहगड हा स्फूर्ती देणार आहे. तो कधीही आला तरी आपल्याला स्फूर्तीस देतो प्रेरणाच देतो, असेही काही पर्यटक सांगतात. 15 ऑगस्टला या किल्ल्यावर ध्वजवंदन होतं. महसूल विभागाचे विभागीय अधिकारी मुख पाहुणे म्हणून येतात. त्यांच्या हस्ते दरवर्षी 15 ऑगस्टला या ठिकाणी ध्वजवंदन होतं.

सिंहगड हा पराक्रमाची साक्ष देतो - सिंहगड जोडी पराक्रमाची साक्ष देतो. तेवढाच निसर्गाचा आनंद देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले बालमित्र आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांना आम्हाला कोंढाणा घ्यायचा आहे, हे सांगितलं नव्हतं. कारण त्यांच्याकडे त्यांच्या मुलाचे लग्न होतं, पण मा जिजाऊंची इच्छा होती की कोंढाणा हा स्वराज्यात यावा. हे ज्यावेळेस तानाजी मालुसरे यांना कळले त्यावेळेस त्याने 'आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे' असे म्हणत हा किल्ला जिंकण्यासाठी ते निघाले. मोठ्या शर्तीने ही झुंज त्यांनी दिली. उदयभान राजपूतशी लढाई करत सिंहगड स्वराज्यात आणला.

हेही वाचा -Human ​Flying Drone : माणसाला घेऊन उडणारा ड्रोन पाहिलाय का?; 'येथे' झाली यशस्वी चाचणी

ABOUT THE AUTHOR

...view details