पुणे- देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. मंगळवारी पुण्यात शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राच्यावतीने आयोजित उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान समारंभ, सर परशुराम महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.
पुण्यातील कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी हेही वाचा -'त्या' बाळांना निर्दयीपणे उघड्यावर टाकणाऱ्या मातापित्यांचा लागला शोध
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. डॉ. एन. एस. उमराणी, शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, केंद्राचे सचिव धनंजय कुलकर्णी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस के जैन उपस्थित होते.
कार्यक्रमात शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राच्यावतीने दिला जाणारा 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार' डॉ. देविदास वायदंडे आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. सोनाली परचुरे यांना तर, पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयास 'उत्कृष्ट शिक्षण संस्था पूरस्कार' देऊन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी 'इडूसर्च' या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात चर्चा करताना नवे संशोधन आणि प्रशिक्षण यांची ज्याप्रमाणे आवश्यकता आहे, त्याप्रमाणेच चांगला मानवी दृष्टीकोन निर्माण करण्याचीही आवश्यकता असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.