महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

TET Scam : शिक्षक पात्रता परीक्षेतील झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी, हजारो उमेदवारांकडून घेतले लाखो रुपये - टीईटी परीक्षा घोटाळा

2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत ( TET exam scam ) तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झालं होते. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून ( Rajya Shikshan Parishad ) या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

TET Scam
शिक्षक पात्रता परीक्षेतील झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी,

By

Published : Aug 8, 2022, 12:56 PM IST

पुणे- राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी होत ( Teacher Eligibility Test Exam scam ) चालली आहे. परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7 हजार 880 उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असू शकते.

2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत ( TET exam scam ) तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झालं होते. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून ( Rajya Shikshan Parishad ) या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. या 7800 विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना इथून पुढे शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे.

7800 विद्यार्थी बोगस पास-बोगस पद्धतीने पात्र झालेल्या या 7800 विद्यार्थ्यांपैकी शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तशा सूचना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. 2019 ला 16 हजार 705 विद्यार्थ्यांनी टी टी परीक्षा दिली होती. त्यापैकी 7800 विद्यार्थी पैसै देऊन परीक्षा पास झाल्याच निष्पन्न झालं होतं. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या शहरात आणि गावात बोगस पद्धतीने भरती होऊन नोकरी करणार्‍या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. 2019 प्रमाणेच 2018 साली घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत देखील गैरव्यवहार झाल्याच उघड झाले आहे. त्याचा तपासही पुणे सायबर पोलीस करत आहेत. त्याचबरोबर 2013 पासून शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सगळ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.



प्रितेश देशमुख याच्यासह अनेकांना अटक -टीईटी घोटाळ्यात पोलीसांनी शिक्षण परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपे, शिक्षण परिषदेचा माजी आयुक्त सुखदेव ढेरे याच्यासह टीईटी परिक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी ए टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्यासह अनेकांना अटक केली आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करताना पुणे सायबर पोलीसांना म्हाडा परीक्षेचा पेपर फुटल्याचं समजलं. तर म्हाडाच्या पेपरफुटीचा तपास करताना टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं होतं. 2018 सालच्या परीक्षेत देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात उमेदवार अपात्र ठरविण्यात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-आंतरराष्ट्रीय मांजर दिवस ; 'या' घरात कुटुंबातील सदस्यांपेक्षा अधिक आहेत मांजरी

ABOUT THE AUTHOR

...view details