महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात शिक्षकाने केली विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी; नातेवाईकांनी काढली धिंड - पुणे गुन्हे वार्ता

तरुणीने संबंधित शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केला आणि घरच्यांना दाखवला. त्यानंतर आज (बुधवार) दुपारच्या सुमारास संबंधित तरुणीच्या नातेवाईक आणि इतर काही व्यक्तींनी महाविद्यालयात जाऊन संबंधित शिक्षकाला जाब विचारला. तर काहींनी त्याच्या तोंडावर शाई टाकत मारहाणही केली.

शिक्षकाने केली शरीरसुखाची मागणी
शिक्षकाने केली शरीरसुखाची मागणी

By

Published : Jul 14, 2021, 8:22 PM IST

Updated : Jul 14, 2021, 8:46 PM IST

पुणे - गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थीनीकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका शिक्षकाची पुण्यातील रस्त्यावरून तोंडाला काळे फासत धिंड काढण्यात आली. पुण्यातील एका महाविद्यालयापासून ते विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंत या शिक्षकाला मारहाण करत धिंड काढण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शिक्षकाने केली विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

काय आहे प्रकरण?

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी ही पुण्याच्या मध्यवस्तीतील एका महाविद्यालयात बारावीला शिक्षण घेते. मागील काही दिवसांपासून संबंधित शिक्षक या तरुणीकडे गुण वाढवून देण्याच्या आमिषाने शरीर सुखाची मागणी करत होता. परंतु संबंधित तरुणीने त्याला वारंवार नकार दिला होता. तरीदेखील या शिक्षकाचा जाच सुरू होता. अखेरीस या तरुणीने संबंधित शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केला आणि घरच्यांना दाखवला. त्यानंतर आज (बुधवार) दुपारच्या सुमारास संबंधित तरुणीच्या नातेवाईक आणि इतर काही व्यक्तींनी महाविद्यालयात जाऊन संबंधित शिक्षकाला जाब विचारला. तर काहींनी त्याच्या तोंडावर शाई टाकत मारहाणही केली. त्यानंतर महाविद्यालयापासून ते विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंत या शिक्षकाची धिंड काढण्यात आली. संतप्त झालेल्या जमावाने मारहाण करतच या शिक्षकाला पोलीस ठाण्यात आणले होते. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकाराची माहिती घेत आहेत. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Last Updated : Jul 14, 2021, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details