पुणे - शहरातील गणेशोत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक मंडळांकडून शहरात विविध ज्वलंत विषयांवर देखावे लवण्यात येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पाश्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे शहरात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. पण, पुण्यातील गणेश मंडळांबरोबर घरघुती गणेशोत्सवात देखील विविध विषयांवर देखावे केले जातात. पुण्यातील संजय तांबोळी कुटुंबीयांच्यावतीने यंदा टोकियो ऑलिम्पिकचा आकर्षक असा देखावा तयार केला आहे.
माहिती देताना संजय तांबोळी आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -मंदिरे उघडल्यानेच कोरोना पसरतो का ? मोरगावमधील महिलांचा सवाल
भारतीय ऑलिम्पिकपटूंना अभिवादन
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून एकूण 7 पदके मिळाली आहेत. या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी पर्यावरण पूरक कागदापासून विविध खेळाडूंचे आकर्षक असे ग्राउंड बनवून त्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गोल्डन बॉय नीरज चोप्रा याचा भालाफेक, पीव्ही सिंधू बॅडमिंटन खेळताना, कुस्तीचे मैदान, हॉकी खेळताना अशी आकर्षक देखावे तयार करून खेळाडूंना अभिवादन करण्यात आले आहे.
गेल्या 23 वर्षांपासून विविध विषयांवर देखावे
संजय तांबोळी दरवर्षी विविध विषयांवर घरच्या गणपतीबरोबर देखावा सादर करत असतात. गेल्या 23 वर्षांपासून हे कुटुंब समाजातील विविध प्रश्नांवर देखावे करत आहे. माळीण, अग्निपंख, 370 कलम अशा विविध विषयांवरदेखील याआधी देखावा करण्यात आला आहे. बाप्पाने लवकरात लवकर कोरोनाला हद्दपार करावे आणि सर्वांना सुखाने नांदू दे, ही गणराया चरणी प्रार्थना संजय तांबोळी यांनी केली. विशेष म्हणजे, या ऑलिम्पिक देखाव्यात मिल्खा सिंह यांना देखाव्याच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्यात आली आहे.
हेही वाचा -माणसांच्या कळपातील हिंस्त्र श्वापदांचा नायनाट करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र यावे - रुपाली चाकणकर