पिंपरी चिंचवड : लष्करात नोकरी लावतो असे सांगून फसवणूक ( Get Job Army ) करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या मिलिटरी इंटिलीजन्सने ही कारवाई ( Pune Military Intelligence Arrested Three People ) केली. पुढील तपासासाठी त्यांना सांगवी पोलिसांच्या ( Sangavi Police Station ) ताब्यात देण्यात आले आहे. गजानन पुरुषोत्तम मिसाळ ( वय, 23 ) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. सतीश कुंडलिक डहाणे, श्रीराम बनाजी कदम आणि अक्षय देवलाल वानखेडे, अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन मिसाळ आणि त्याचे सहकारी बीआरोमधील मोटर मॅकेनिक या पदाच्या भरतीसाठी सतीश डहाणे, अक्षय देवलाल वानखेडे भेटण्यासाठी औंध रक्षक चौक येथे आले होते. तेव्हा 70 हजार रुपये देताना पुण्याच्या मिलिटरी इंटेलिजन्सने ताब्यात सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, यापुर्वी 31 ऑक्टोबर मोटर मेकॅनिकल ची भरती झाली होती. त्यामध्ये 36 जणांना नोकरी लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोपींकडे प्रश्नपत्रिका कोठून आली याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती, आयुक्त कृष्ण प्रकाश ( Pcmc Police Commissioner Krushna Prakash ) यांनी दिली.
लष्कर भरती घोटाळा?