पुणे - देशातील एकमेव कांद्यावर संशोधन करणाऱ्या कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरूनगर येथे प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शपथ देण्यात आली. केंद्र संचालक व शास्त्रज्ञ मेजर सिंग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शपथ दिली.
कांदा लसूण संशोधन केंद्रात प्लास्टिक बंदीची घेतली शपथ आपला परिसर व आपले कार्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी वर्षातील शंभर तास व आठवड्यातील दोन तास श्रमदान करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करून परिसरात दुर्गंधी येणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. यासाठी स्वतःचे घर गाव कार्यालय व आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी परिश्रम घेणार. पुढील काळात कुठल्याही ठिकाणी प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची काळजी घेणार असल्याची शपथ आज कांदा लसून संशोधन केंद्रात सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली.
हेही वाचा -पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात सरावादरम्यान दोघांचा मृत्यू
प्लास्टिकचा वापर रोजच्या दैनंदिन जीवनात मानवी जीवनासाठी घातक असून प्लास्टिकमुळे आपल्या आजूबाजूचा परिसर दुर्गंधीयुक्त होऊन रोगराई पसरते. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी केंद्र व राज्य सरकार दोघांनीही प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे. शासकीय कार्यालयात कार्यालय प्रमुख शपथ घेऊन प्लास्टिक बंदी व परिसर स्वच्छतेची शपथ घेत आहेत. मात्र, पुढील काळात प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम योग्य पद्धतीने केले तर हे मिशन यशस्वी होईल, हेच या निमित्ताने सांगावे लागेल.
हेही वाचा -कर्वे रस्त्यावर हँडलूमच्या दुकानाला आग; जीवितहानी टळली