पुणे -पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या पुण्यातील मध्यभागी असलेल्या पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या अंडरग्राऊंड मार्गाचं काम अखेर पूर्ण झालं ( swarget to budhwar peth pune metro ) आहे.
Pune metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते बुधवार पेठ अंडरग्राऊंड मार्गचं काम पूर्ण; पाहा VIDEO - पुणे मेट्रोच्या स्वारगेट बुधवार पेठ अंडरग्राऊंड मार्गचं काम पूर्ण
गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या पुण्यातील मध्यभागी असलेल्या पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या अंडरग्राऊंड मार्गाचं काम अखेर पूर्ण झालं ( swarget to budhwar peth pune metro ) आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या भूमिगत मार्गाच्या बोगद्याच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झालं आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास टीबीएम मुळा-2 ने बुधवार पेठ मेट्रो स्थानकावर ब्रेक थ्रू करण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे आता लवकरच पुणेकरांना भुयारी मेट्रो मधून प्रवास करण्यास मिळणार आहे. पुण्यातील भुयारी मार्गाचे काम हे अंतिम टप्प्यात आल आहे. मार्च 2023 पर्यंत भुयारी मार्गातून मेट्रो धावेल, असा विश्वास पुणे मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -Neelam Gorhe : काश्मिरी महिला पंडितांच्या हाती शस्त्र द्या; नीलम गोऱ्हेंची केंद्राकडे मागणी