पुणे -दिल्लीमध्ये गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी शेतकरी कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
मोदींचा पुतळा जाळत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्लीमध्ये गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी बांधवांनी शेतमालाच्या विषयी मोदी सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या कायद्याविरोधात जनआंदोलन उभारले आहे. गेल्या पाच दिवसांपासून कुणीही त्याची दखल घेतलेली नाही. दिलेले आश्वासन कुठेही पाळले जात नाही. उलट हे सरकार शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करत आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
प्रकाशतात्या बालवडकर - प्रदेश उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना हेही वाचा -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा जातेगाव घाटात खून
हा कायदा पुन्हा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार
केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याचा पुनर्विचार व्हावा यासाठी दिल्ली येथे पंजाब आणि हरियाणा येथील लाखो शेतकऱ्यांनी जनआंदोलन उभा केले आहे, त्या आंदोलनाची दखल हे सरकार घेत नाही. उलट शेतकरी व शेतकऱ्यांच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे आणि शेतकऱ्यांनाच घरचा आहेर दिला जात आहे. मोदी सरकारने जो कायदा आणला आहे तो शेतकरी विरोधी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या जनआंदोलनाला पाठिंबा देतो, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी आंदोलकांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा -बॉलिवूडला कोणी मुंबईबाहेर नेऊ शकत नाही - चंद्रकांत पाटील