पुणे - पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक संतापजनक आणि चीड आणणारी घटना उघडकीस आली. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला चार वर्षाच्या मुलीसमोरच पुलावरून नदीत फेकले.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पुलावरून नदीत फेकलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार - पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला चार वर्षाच्या मुलीसमोरच पुलावरून नदीत फेकल्याची घटना घडली आहे. पुण्यातील गजबजलेल्या आरटीओ चौकाजवळील मुठा नदीपात्रात हा प्रकार घडला. या घटनेत तीस वर्ष महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यातील गजबजलेल्या आरटीओ चौकाजवळील मुठा नदीपात्रात हा प्रकार घडला. या घटनेत तीस वर्ष महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसम्मा कुंभार (वय 30) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी पती नागप्पा शिवप्पा कुंभार (वय 37) याला पोलिसांनी अटक केली. खडकी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभार पतिपत्नी दोघेही बिगारी काम करतात. दत्तवाडी परिसरात ते राहत होते. त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. आरोपी नागप्पा कुंभार हा मागील एक महिन्यापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा. त्यामुळे कंटाळून बसम्मा कुंभार सोमवारी (31 ऑगस्ट) मुलीसह मूळगावी जाण्यासाठी निघाली होती. यावेळी यावेळी आरोपीने तिला आरटीओ जवळील पुलावर गाठले. त्याठिकाणी त्यांच्यात परत एकदा वाद झाले. यावेळी आरोपी नागप्पा याने तुला जीवे मारून टाकतो असे म्हणत तिला पुलावरून खाली फेकले. सुदैवाने बसम्मा नदीपात्रातील चिखलात पडल्याने थोडक्यात बचावली. तिची प्रकृती गंभीर असून ससून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. सहायक पोलिस निरीक्षक देवकर अधिक तपास करीत आहेत.