पुणे दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या जुनैद मोहम्मद Junaid Mohammed आणि त्याच्या साथीदारांचा कट महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने उघडकीला आणला आहे. उत्तर भारतात आगामी काळात होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या भाजप रॅलीवर देखील हल्ला करायचा प्लॅन जूनैद आणि त्याच्या साथीदारांनी बनवला होता. नरसिंहानंद सरस्वती हे गाझियाबाद मधील असलेल्या शिवशक्ती धामचे महंत आहे. ते हिंदू स्वाभिमान नावाची संस्था देखील चालवतात. त्यांनी अनेक वेळा प्रक्षोबक वक्तव्ये केली आहेत. जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी हे उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आहे. वसीम रिजवी यांनी सनातन धर्मात प्रवेश केला होता. संदीप आचार्य हे उत्तर प्रदेशचे असून वादात सापडलेल्या गणायांचे ते लेखक आहेत. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे स्टार प्रचारक म्हणून देखील आचार्य यांची ओळख होती. जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तरप्रदेशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाले होते.
सोशल मीडियावर सक्रिय होता जुनेद मोहम्मदकाश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून जुनैदला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्यात आल्याचे या आधी झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुनेद मोहम्मद याला पुण्यातील दापोडी भागातून 24 मे रोजी ताब्यात घेण्यात आले दिल्ली, यूपीतील तीन प्रमुख लोकांवर हल्ला करण्याचा कट आखल्याप्रकरणी पुण्यातून एटीएसने अतिरेक्यांना अटक केली आहे. स्फोटके बनवायला लागणाऱ्या गोष्टी आणि पैसे हे थेट पाकिस्तानात बसलेल्या एका मास्टरमाईडकडून येणार होते. जो प्लॅन आखला जाणार त्यासाठी जुनेद मोहम्मद निघण्याच्या तयारीत होता. मात्र त्या आधीच राज्य दहशतवाद विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले. जुनेद मोहम्मद सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याने आत्तापर्यंत सतराहून अधिक फेसबुक अकाउंट तयार केले होते आणि त्याद्वारे तो इतरांशी संवाद साधायचा.