पुणे प्रतीसेनाभवन Build Pratisena Bhavan उभारण्याची भाषा करणाऱ्या लोकांबद्दल मला अपार सहानुभूती वाटते. डुप्लीकेट डुप्लिकेटचा खेळ खेळता खेळता सत्य आणि भ्रम यातला फरक विसरून कोल्ह्यांनी स्वतः वाघ असल्याचा बनाव सुरू केला आहे. अर्थात लांडग्यांच्या कळपात गेल्यावर हे बोलणे स्वभाविक आहे असे म्हणत सुषमा अंधारे Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare यांनी शिंदे गट आणि भाजप यांना जोरदार टोला लगावला आहे.
शिंदे गट-उद्धव ठाकरे गट आमने-सामने आमदार सदा सरवणकर यांनी दादरमध्ये प्रतिसेनाभवन उभारण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट Shiv Sena Leader Uddhav Thackeray आमने सामने उभे राहिले आहेत. यावरून आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांना चांगलच फैलावर घेतले आहे. कोल्ह्यांनी स्वतः वाघ असल्याचा बनाव सुरू केला आहे अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.