पुणे - पुणे शहरात मागच्या आठवड्यात सेक्सटॉर्शनच्या त्रासाला कंटाळून दोन युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता अशा सेक्सटॉर्शनच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वर्षभरात पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे सेक्सटॉर्शनच्या तब्बल 1400 अर्ज आल्या आहेत. तर सेक्सटॉर्शनबाबत एक गुन्हा दाखल आहे, अशी धक्कादायक माहिती सेक्सटॉर्शनबाबत समोर आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की हे खूप दुर्दैवी आहे. सोशल मीडियाचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी होता कामा नये असही त्या म्हणाल्या आहेत. यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी प्रबोधन केले पाहिजे. तसेच याची माहिती तरुण पिढीला दिली पाहिजे असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांची प्रत्रकार परिषद चांगला उपयोग कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे - अशा पद्धतीने जर सेक्सटॉर्शन होत असेल तर त्या व्यक्तीला आधार दिला पाहिजे. या गोष्टी चुकीच्या असून समाजाने यात पुढे येऊन काम केले पाहिजे. मी देखील जेव्हा कॉलेज तसेच विविध संस्था संघटना येथे जाणार तसेच नवीन पिढीशी जेव्हा बोलेल तेव्हा मी स्वतः यावर बोलेल असही त्या म्हणाल्या आहेत. यासाठी नवीन कायदे तसेच नवीन नियम होणे गरजेचे आहे. कारण आमच्या काळात टेक्नॉलॉजी कमी होते. आत्ता टेक्नॉलॉजी वाढत आहे त्यामुळे आयुष्यात नवीन चॅलेंजस येत राहतात. त्यामुळे आपण याच्यावर मात करून समाजाला याचा चांगला उपयोग कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे असही त्या म्हणाल्या आहेत.
कशी होते फसवणूक - सुरवातीला आपल्याला आपल्या व्हॉट्सॲप वर एका अनोळखी नंबरवरून एका सुंदर मुलीचं फोटो येतो आणि त्यांनतर एक हाय म्हणून मॅसेज येतो. आपण जर त्याला प्रतिसाद दिला तर त्यातून हळूहळू ओळख केली जाते. आणि मग बोलण हे वाढत जातो.
दुसरी स्टेज - आपण जरी आलेल्या मॅसेज ला प्रतिसाद दिला आणि जस जशी ओळख निर्माण होते तसच समोरून आग्रह केला जातो की व्हिडियो कॉल वर बोलूया. आणि त्यानंतर जेव्हा आपल्याकडून व्हिडियो कॉल केला की समोर असलेली मुलगी न्यूड होते. आणि ती आपल्याला ही न्यूड होण्याबाबत आग्रह करते. चेहरा कॅपचर होऊ पर्यंत हा व्हिडियो कॉल केला जातो. लगेच व्हॉट्सॲप वर त्या व्हिडियो कॉल चा व्हिडियो येतो.
तिसरी स्टेज -जेव्हा हा व्हिडियो कॉल केला जातो तेव्हा तेथून धमक्या सुरू होतात. पहिल्यांदा अशी धमकी दिली जाते की जर आपण पैसे नाही दिले तर मी तक्रार दाखल करेल अन्यथा सोशल मीडियावर व्हायरल करेल. आपण जर त्याला प्रतिसाद नाही दिला तर खूप मॅसेज येतात. काय करू पैसे देतात की पाठवून देऊ. त्यात ही जर आपण काहीही प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा एका अनोळखी व्यक्ती कडून कॉल येतो आणि तो म्हणतो की मी दिल्ली पोलीस पोलीस मधून बोलतोय आपली तक्रार आली आहे. अशी थेट धमकी दिली जाते. याच धमकीला तरुण बळी पडतात आणि पैसे देतात. जर पैसे दिले गेले तरी दोन ते तीन दिवसांनी पुन्हा कॉल येतो आणि पैश्यांची मागणी केली जाते. जर यात पैसे दिले गेले नाही तर तो व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला जातो.