महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुप्रिया सुळे यांनी घेतली स्वप्नील लोणकरच्या कुटूंबियांची भेट - राजकीय बातम्या

दौंड तालुक्यातील केडगाव येथील स्वप्नील लोणकर या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याच्या तणावातून आत्महत्या केली होती. घटनेने लोणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वप्नीलच्या घरी भेट दिली.

खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे

By

Published : Jul 10, 2021, 4:43 PM IST

दौंड -दौंड तालुक्यातील केडगाव येथील स्वप्नील लोणकर या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याच्या तणावातून आत्महत्या केली होती. घटनेने लोणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वप्नीलच्या घरी भेट दिली. स्वप्नीलच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही सर्वजण लोणकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली स्वप्नील लोणकरच्या कुटूंबियांची भेट

'चर्चेतून प्रश्न सुटतात, कोणीही टोकाचे निर्णय घेऊ नयेत'

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, चर्चेतून प्रश्न सुटतात त्यामुळे कोणीही टोकाचे निर्णय घेऊ नयेत, अशी विनंती आहे. विद्यार्थ्यांना केव्हाही बसायचे असेल तर चर्चेला तयार आहे. सरकारसोबत चर्चा करायची असेल तर त्यासाठीही तयार आहोत. आंदोलन करण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना आहे. परंतु आंदोलनाबरोबर सरकारसोबत चर्चा करत राहिलो तर यातून नक्कीच मार्ग निघू शकेल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

अनेक राजकीय नेत्यांकडून स्वप्नीलच्या कुटुंबियांचे सांत्वन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याच्या तणावातून दौंड तालुक्यातील केडगाव येथील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फुरसुंगी जवळील गंगानगर येथे ही घटना घडली होती. स्वप्नील सुनील लोणकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने सुनील लोणकर यांचे कुटुंब दुःखाच्या छायेत आहे. या घटनेनंतर स्वप्नीलच्या केडगाव येथील घरी अनेक राजकीय नेते पदाधिकारी भेट देऊन स्वप्नीलच्या कुटूंबियांचे सांत्वन करीत आहेत.

हेही वाचा -'त्या' बुडालेल्या कारच्या बदल्यात मालकाला मिळाली नवी कार

ABOUT THE AUTHOR

...view details