पुणे - आपला देश कोरोनावर मात करण्यासाठी लढत असताना सरकार व प्रशासनाला साथ द्या, जनतेने सहकार्य करा, असा संदेश कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
'प्रशासनाला देऊ साथ, कोरोनावर करू मात' - मंत्री दिलीप वळसे पाटील
आताच्या घडीला आपण ही शिस्त पाळताना आपला नव्हे तर समाजाचा, देशाचा विचार करणे महत्त्वाचे असल्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
कोरोना विषाणूची साथ आटोक्यात यावी म्हणून सरकार आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. डॉक्टर अहोरात्र मेहनत करून देशसेवा करत आहेत. त्या सगळ्यांना साथ देणे आपले कर्तव्य आहे. तुम्हाला घरी बसून किंवा मित्र- मैत्रिणींना, नातेवाईकांना न भेटून चुकल्या चुकल्या सारखे होणार आहे. पण, तो संपर्क टाळणे आपल्याकरिताच नाही, तर समाजात ही साथ पसरू नये यासाठी नितांत गरजेचे आहे.
आताच्या घडीला आपण ही शिस्त पाळताना आपला नव्हे तर समाजाचा, देशाचा विचार करणे महत्त्वाचे असल्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच 'प्रशासनाला देऊ साथ, कोरोनावर करू मात' असा नारा त्यांनी दिला आहे.