महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sunil Mehta Passes Away : मेहता पब्लिशिंग कंपनीचे संचालक सुनील मेहता यांचे निधन - मेहता प्रकाशन संस्थेच्या मालकाचे नाव

Sunil Mehta Passes Away
सुनील मेहता यांचे निधन

By

Published : Jan 12, 2022, 5:35 PM IST

Updated : Jan 12, 2022, 7:52 PM IST

17:33 January 12

पुणे - मेहता पब्लिशिंग कंपनीचे संचालक आणि प्रकाशक संघाचे माजी कार्यवाह सुनील मेहता यांचे दुःखद निधन ( Sunil Mehta Passes Away ) झाले आहे. उद्या (गुरुवार) सकाळी ९.३०ते १०.३० अंत्यदर्शनासाठी त्याचे पार्थिव हे मेहता पब्लिशिंग हाऊस येथे ठेवण्यात येणार आहे.

पूना हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार -

मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेचे संचालक सुनील मेहता यांचे आज वयाच्या 56 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. किडनी स्टोनवरील उपचारासाठी त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते पण उपचारादरम्यान त्यांचे एकेक अवयव निकामी होत गेले.

उद्या सकाळी ९.३०ते १०.३० अंत्यदर्शन -

दोन दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज (बुधवारी) दुपारी 4 वाजता त्यांचे निधन झाले असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रकाशन व्यवसायाला आधुनिक रुप देणाऱ्या प्रकाशकांमध्ये त्यांचे नाव आघाडीने घेतले जाते. आजच्या अनेक ख्यातनाम लेखकांना त्यांनीच आपल्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ओळख मिळवून दिली. त्यांनी अनेक विषयांना हात घालणारी दर्जेदार अशा पुस्तकांची निर्मिती करण्यावर सातत्याने भर दिला होता. मराठी तसेच इंग्रजीमधील ख्यातनाम प्रकाशन संस्था म्हणून मेहता पब्लिशिंग कंपनीचे नाव घेतले जाते.

सुनिल मेहता यांची कारकिर्द -

  • मराठीत परदेशी आणि प्रादेशिक पुस्तकांचे भाषांतर आणि प्रकाशन -

मेहता पब्लिशिंग हाऊसचे सीईओ आणि एमडी, सुनील अनिल मेहता यांनी १९८६ मध्ये त्यांचे वडील अनिल मेहता यांच्याकडून व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी अगदी लहान वयापासून मेहता पब्लिशिंग हाऊसचा पाया आणि वाढ पाहिली आणि काम शिकून घेतले. तसेच वडिलांकडून व्यवसायाची दोरी आपल्या हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची ताकद वाढली आहे. मराठीत परदेशी आणि प्रादेशिक पुस्तकांचे भाषांतर आणि प्रकाशन केले. तसेच ई-बुक सेवा सुरू देखील केली.

  • मराठी प्रकाशन विश्वाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेलेले ते एकमेव प्रकाशक -

भारतातीलच नव्हे तर जगभरातील उत्तमोत्तम साहित्यकृती त्यांनी मराठीत अनुवादीत करुन अनुवादीत पुस्तकांचे एक वेगळे मोठे दालनच मराठी वाचकांसाठी खुले करुन दिले होते. सप्टेंबर 2012 मध्ये ओस्लो (नॉर्वे) इथे नॉर्वेजियन साहित्याचा इतर देशांमध्ये प्रचार करण्‍याच्या प्राथमिक उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या नॉरला (NORLA) सेमिनारमध्ये मराठी प्रकाशन विश्वाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेलेले ते एकमेव प्रकाशक होते.

हेही वाचा -Drone Attack : राज्यात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याचा धोका; प्रमुख शहरात अलर्ट

Last Updated : Jan 12, 2022, 7:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details