पुणे- पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerawada Jail) खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली आहे. शिरुर येथील सचिन मधुकर नरवडे वय 27 असे मृत झालेल्या आरोपीचे नाव आहे.
येरवडा कारागृह अधीक्षक (Yerawada Prison Superintendent) राणी भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मधुकर नरवडे त्याने त्याच्या पत्नीचा खून (Wifes murder) केला होता.या गुन्हया प्रकरणी तो येरवडा कारागृहात होता आणि आरोपी सचिन हा काही महिन्यापासून नैराश्यात होता. त्यामुळे कोणत्याही कैद्यासोबत तो बोलत नसायचा याबाबत त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. दरमान्य गुरूवारी दुपारच्या सुमारास कारागृहातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली ही बाब तेथील कैदी आणि पोलिसांच्या लक्षात येताच, तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केले.
अमरावती तुरुंगामधून पळाले होते तीन कैदी-अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ( Amravati District Central Jail ) मंगळवारी पहाटे तीन कैदी फरार ( Three Prisoners Escaped ) झाल्याची माहिती २८ जूनला समोर आली होती. अतिशय कडेकोट बंदोबस्त असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फ्रेजरपुरा पोलीस ( Frazerpura Police ) कारागृहात पोहोचले असून, या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावरून केली जात आहे. प्रार्थना सभागृहात बंदिस्त कैदी होते. साहिल अजमल कासकेकर राहणार रत्नागिरी, रोशन गंगाराम उईके राहणार धारणी आणि सुमित धुर्वे राहणार धारणी, असे कारागृहातून पळालेल्या कैद्यांची नावे आहेत.