महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ससून रुग्णालयात आतापर्यंत 184 म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया; 106 रुग्ण बरे - Successful surgery on mucormycosis patients

ससून रुग्णालयात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून 323 म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल झाले होते. यातील 189 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

ससून रुग्णालय
ससून रुग्णालय

By

Published : Jun 17, 2021, 6:29 PM IST

Updated : Jun 17, 2021, 7:38 PM IST

पुणे -ससून रुग्णालयात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून 323 म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल झाले होते. यातील 189 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून यातील 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 184 रुग्णांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

माहिती देताना डॉ. मुरलीधर तांबे

देशात कोरोनापाठोपाठ आता काळ्या,पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीचे संकट उभे राहिले आहे. देशात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. पुणे शहरातही या आजाराचे 450 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात पुणे जिल्ह्यासह इतर ही जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल होऊन उपचार घेत आहेत.

  • 60 टक्के रुग्ण जिल्ह्यातील तर 30 टक्के रुग्ण इतर जिल्ह्यातील

कोरोना पाठोपाठ आत्ता म्युकरमायकोसिसच्या रुग्णात ही दिवसंदिवस वाढ होत आहे. ससून रुग्णालयात 60 टक्के म्युकरमायकोसिसचे रुग्ण हे जिल्ह्यातुन उपचारासाठी दाखल होत आहेत, तर 40 टक्के रुग्ण हे इतर जिल्ह्यातून उपचारासाठी येत आहेत. गेल्या चार महिन्यापासून ससून रुग्णालयात आत्तापर्यंत म्युकरमायकोसिसचे 323 रुग्ण दाखल झाले आहेत. ससून रुग्णालयात 2 क्रेनीओटोमी, 2 कँसर व म्युकरमायकोसिस तसेच 11 रुग्णांच्या मेंदूच्या रक्त वाहिनीमध्ये बुरशीचा संसर्ग असल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली आणि 4 रुग्णांच्या मेंदूमध्ये बुरशीमुळे पू झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांनी दिली.

  • दिवसाला 4 ते 5 नवीन रुग्ण

देशासह राज्यातही कोरोना पाठोपाठ आत्ता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातही या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. ससून रुग्णालयात सुरवातीला आठवड्यातून एक ते दोन नवीन रुग्ण उपचारासाठी येत होते. आता दिवसाला 4 ते 5 नवीन रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
सध्या ससून रुग्णालयात 188 म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 106 रुग्ण बरे होऊन गेले आहे, असेही यावेळी डॉ. तांबे यांनी सांगितले.

ससून रुग्णालयात दरोरोज 15 ते 20 रुग्ण पोस्ट कोविडसाठी दाखल

कोरोना झाल्यानंतर पोस्ट कोविडमध्ये डोकेदुखी, शारीरिक वेदना, श्वास घ्यायला त्रास होणे, थकवा येणे, वास न येणे अशी लक्षणे दिसतात. पूर्वी फक्त ससून रुग्णालयातच पोस्ट कोविड सेंटर असल्याने येथे रुग्ण उपचारासाठी येत होते. आता शहरात ठिकठिकाणी पोस्ट कोविड सेंटर सुरू झाल्याने विविध रुग्णालयात जाऊन रुग्ण उपचार घेत आहेत. असे असतानाही ससून रुग्णालयात दररोज 15 ते 20 रुग्ण पोस्ट कोविडसाठी उपचार घेत आहेत, असे यावेळी डॉ. तांबे यांनी सांगितले आहे.

  • कोणाला जास्त होत आहे म्युकरमायकोसिस हा आजार

कोरोना झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस हा नवीन आजार होत आहे. यात तीन प्रकारच्या बुरशी असतात. काळी, पांढरी आणि पिवळी बुरशी हे तीन प्रकार आहेत. राज्यात काळ्या बुरशीच्या रुग्णांचे प्रमाण हे अधिक आहे. पांढरी बुरशीचे काही रुग्ण हे बिहारमध्ये आढळून आले आहेत. तर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे काही रुग्णांना पिवळ्या बुरशीची लागण झाली आहे. यातील एक साम्य म्हणजे हे बुरशीजन्य आजार आहे. हा आजार कोरोना झालेल्या रुग्णांना झाला आहे. त्यातही ज्यांना डायबेटीस झाला आहे आणि ज्यांना कोरोना झाला आहे, आणि ज्यांना स्ट्रॉईड दिले आहे अशा रुग्णांना हा आजार सर्वाधिक होत आहे.

Last Updated : Jun 17, 2021, 7:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details