पुणे - जिद्द, चिकाटी आणि परिश्रम केल्याने कोणतीही अशक्य गोष्टी शक्य होते. हे नेहमी आपण वाचत आलोय. याची प्रचिती अनेक उदाहरणातून आपण पहातच आलो आहेत. अशीच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समाजातील लोकांचा विरोध असताना देखील पुण्यातील झोपडपट्टीत राहणारी शहनवाज पठाण ही पुण्यातील पहिली मुस्लिम प्रथमवर्ग न्यायाधीश झाली आहे. ( first muslim girl from pune become a judge )
तिच्या या यशाचे सर्वत्र होते आहे कौतुक -पुण्यातील लोहियानागर येथे राहणारी शहनवाज पठाण हिने 24 एप्रिलला दुसऱ्या प्रयत्नात प्रथमवर्ग न्यायाधीश या परीक्षेत यश संपादन केले. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ती याची तयारी करत होती. आणि आज ती पुण्यातील पहिली मुस्लिम महिला न्यायाधीश झाली असून तिच्या या यशाचा सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या 4 ही मुलींना चांगल्या दर्जाचा शिक्षण दिले -पुण्यातील लोहियानगर येथे राहणारे अमन खा पठाण यांचे लोहीयानगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून किराणाचे दुकान आहे. त्यांना 4 मुली आणि एक मुलगा आहे. पठाण हे सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांना त्यांच्या आयुष्यात जो शिक्षणासाठी त्रास झाला. तो त्रास आपल्या पाल्यांना होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या 4 ही मुलींना चांगल्या दर्जाचा शिक्षण दिले आणि मुली शिकली की सर्व घर शिकतो, याच विचाराने त्यांनी त्यांच्या मुलींना शिक्षण दिले. त्यांची सर्वत्र छोटी मुलगी शहनवाज हिला त्यांनी तिच्या आवडीनुसार शिक्षण देऊन आज न्यायाधीश केले आहे. मुलींच्या शिक्षणाला विरोध केला तरीही मुलींना शिक्षण दिले.