पुणे - मागील आठवड्यापासून पुणे शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार शहरातील महाविद्यालय सुरू करण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आजपासून (सोमवारी) पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील बहुतांश महाविद्यालयात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मॉडेल महाविद्यालयातून लसीकरण मोहिमेला शुभारंभ करण्यात आला.
पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण अनेक विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयातील कर्मचारी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने महाविद्यालयात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सुमारे २०० लसीकरण केंद्र असले तरी आता त्यात महाविद्यालयांची भर पडणार आहे. १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लसीकरण न झालेले नाही त्यांच्यासाठी महापालिकेतर्फे थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा-पट्टणकोडोली विठ्ठल-बिरदेव यात्रा : यंदा भरपूर पाऊस, कडधान्य महाग होणार- भाकनुक