पुणे:-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले (PM Modi Pune Visit) असून आज शहरातील विविध प्रकल्पांचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे शहरातही महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे मेट्रोचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM inaugurates Pune Metro) यांच्याहस्ते नुकतंच झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गरवारे स्टेशन ते आनंदनगर मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने प्रवास केला. पुण्यातील कामयानी संस्थेतील दिव्यांग तसेच शाळकरी मुलींबरोबर बातचीत करत मेट्रोतून प्रवास केला. यावेळी या संस्थेतील 10 मुलं मुली हे उपस्थित होते आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिलखुलास संवाद साधला...
PM Modi Students meet Pune : 'पंतप्रधानांशी भेटीचा विश्वास बसत नव्हता; विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना - पुणे मेट्रो
आमची निवड ही शाळेतून करण्यात आली. सुरवातीला जेव्हा आम्हाला सांगितलं की, तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मेट्रोतून प्रवास करायचा आहे तर आम्हाला विश्वास बसला नाही, अशी भावना विद्यार्थांनी (PM Modi Students meet Pune ) व्यक्त केली. पंतप्रधान पुणे दौऱ्यावर आले असून,(PM inaugurates Pune Metro) त्यांनी पुण्यातील कामयानी संस्थेतील दिव्यांग तसेच इतर विद्यार्थांसोबत बातचीत केली.
पंतप्रधानांशी भेट झाली यावरच विश्वास बसत नव्हता
आमची निवड ही शाळेतून करण्यात आली. सुरवातीला जेव्हा आम्हाला सांगितलं की, तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मेट्रोतून प्रवास करायचा आहे तर आम्हाला विश्वास बसला नाही. मग आम्ही जेव्हा त्यांना भेटलो तर आम्हाला चांगले वाटले. त्यांनी आम्हाला विचारलं की मेट्रोतून प्रवास केल्यावर कसं वाटत आहे. कोणत्या शाळेतून आहे? पुढे काय करायचं आहे ? हे प्रश्न त्यांनी विचारले.
ही वाचा -PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण