महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एमपीएससी परीक्षा प्रकरण : विद्यार्थी संतप्त, आमदार पडळकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात - PUNE LATEST NEWS

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ मार्च रोजी होऊ घातलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पुण्यातील नवी पेठ येथे रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरु केले आहे. विद्यार्थ्यांनी नवी पेठ येथे रास्ता रोको केला आहे.

Students in Pune protest as the MPSC exam scheduled on 14th of March got postponed again
14 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यीं सतप्त , विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

By

Published : Mar 11, 2021, 3:38 PM IST

Updated : Mar 11, 2021, 11:03 PM IST

पुणे/कोल्हापूर/औरंगाबाद/ जळगाव - 14 तारखेला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. परीक्षा नियोजित वेळेत व्हावी यासाठी पुण्यातील नवी पेठेत विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. या आंदोलनात गोपीचंद पडळकर सहभागी झाले असून, ते या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. आमदार पडळकरांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी परीक्षेची तारीख शुक्रवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे समाजमाध्यमातून दिलेल्या संदेशाद्वारे सांगितले आहे.

आमदार गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात, ठाकरे सरकार विरूद्ध रोष

एमपीएससी परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलन्यात आली आहे, यामुळे सरकारच्या विरोधात आम्ही निदर्शने करत आहोत. सरकारने जे पाऊल उचलेले आहे ते आमच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. सरकार असे निर्णय घेत असेल तर त्यांनी खुर्ची सोडून घरी बसावे, अशा संतप्त प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी आंदोलन स्थळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रात्री उशिरा पुणे पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवले आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे पडळकर यांना ताब्यात घेतले आहे.

आमदार गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
  • पुणे -पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकरांना ताब्यात घेतले. ते आपल्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम होते.
एमपीएससीची परीक्षा एका आठवड्यात होणार, उद्धव ठाकरेंचे आश्वासन
  • मुंबई -एमपीएससीची परीक्षा आठवड्याभरात होणार आहे. या बद्दलचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
14 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थीं संतप्त, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
  • मुंबई - भाजप हा भयानक दांभिक पक्ष, MPSC च्या मुद्यांवरुन सचिन सावंतांचा भाजपवर टीका. विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चाकरून नीर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. राज्य सरकार श्रीमंत मराठ्यांच्या दबावाला बळी पडत आहे. मुख्यमंत्र्यानी कणा दाखवून परिक्षा घ्याव्यात. ओबीसी एससी एसटी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, याचा आम्ही निषेध करतोय, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले
14 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थीं संतप्त, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
  • सांगली - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलेलीच्या निषेधार्थ सांगलीत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी रस्त्यावर उतरत राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला .
  • आमदार राम सातपुते आंदोलनाच्या ठिकाणी आले असून ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
  • जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा रद्द केल्याने जळगावात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. शहरातील कोर्ट चौकात विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने 14 मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोर्ट चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनामुळे शहरात वाहतूक ठप्प झाली होती.
  • औरंगाबाद -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14 मार्च रोजी होणाऱ्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णय विरोधात परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी औरंगाबादेत आंदोलन सुरू केले. औरंगपुरा भागात विद्यार्थ्यांनी रस्ता रोको सुरू करत राज्य सरकार विरोधी घोषणाबाजी केली.

परीक्षा पुढे ढकलण्याचे सत्र सुरू -

गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भावमुळे २२ मार्च २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक २६ एप्रिल २०२० आणि १० मे २०२० ला नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन्ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर सतत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा होऊ शकली नाही. अनलॉक अंतर्गत शाळा महाविद्यालयात सुरू झाले होते. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवार १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित केलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

या कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलली -

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून जिल्ह्यानुसार लॉकडाऊन आणि प्रवासावर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च, २०२१ ला पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नव्या तारखा लवकरच जाहीर -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज आपल्या संकेतस्थळावर एक परिपत्रक प्रकाशित करत यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. :

Last Updated : Mar 11, 2021, 11:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details