महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Droupadi Murmu Victory Celebration : द्रोपदी मुर्मू झाल्या राष्ट्रपती.. 400 आदिवासी विद्यार्थ्यांनी केला आनंदोत्सव साजरा - Netaji Subhash Chandra Bose Military School

द्रोपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल, आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या 400 आदिवासी विद्यार्थ्यांनी (Tribal students) अनोख्या पद्धतीने ढोल-ताश्याच्या तालावर (Netaji Subhash Chandra Bose Military School) नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत आदिवासी नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या व राष्ट्रपती झाल्यानिमित्त (congratulated Droupadi Murmu on his election as President) अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या पत्रात मुर्मू यांच्याकडे भेटीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थी
नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थी

By

Published : Jul 22, 2022, 8:21 PM IST

पुणे:भारताच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षाच्या वाटचालीत द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu)यांच्या रुपानं पहिल्यांदाच आदिवासी व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानिमित्त पुण्याजवळील फुलगाव येथील (Netaji Subhash Chandra Bose Military School) नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याठिकाणी आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 400 आदिवासी विद्यार्थी आणि ईश्वर पूरम प्रकल्पांतर्गत अरुणाचल प्रदेश व नागालँड मधील आदिवासी विद्यार्थी (Tribal students) शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी पेढे वाटून, ढोल-ताश्याच्या तालावर आदिवासी नृत्य सादर करून आनंदोत्सव साजरा केला. विद्यार्थ्यांनी पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या व राष्ट्रपती झाल्यानिमित्त (congratulated Droupadi Murmu on his election as President) अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या पत्रात मुर्मू यांच्याकडे भेटीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया

लोकसेवा प्रतिष्ठान संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी लोकसेवा शैक्षणिक संकुल फुलगाँव येथील, आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत 400 आदिवासी विद्यार्थी हे शिक्षण घेत आहे. तसेच ईश्वरपुरा प्रकल्प आणि नागालँड येथील ही, विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आदिवासी महिला म्हणून द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. या निवडीबाबत संस्थेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांकडून जल्लोष

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. विद्यार्थ्यांनी द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देताना व त्यांचे अभिनंदन करतानाच, त्यांना भेटीची इच्छा देखील व्यक्त केली. द्रौपदी मुर्मू या आदर्श व्यक्ती असून त्या आमच्या प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही देशाची व समाजाची सेवा करायची आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी देशाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत महत्त्वाची व अभिमानाची घटना आहे. त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांनी द्रौपदी मुर्मू यांचे पोस्टर उंचावत, एकमेकांना पेढा भरवत हा आनंद साजरा केला आहे. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी ढोल-ताश्याच्या तालावर आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य सादर करीत द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या.

congratulated Droupadi Murmu

हेही वाचा :Breaking : राज्यात प्रथमच! हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक

ABOUT THE AUTHOR

...view details