पिंपरी-चिंचवड : महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने अवघ्या 30 हजार (student made e bike for 30 thousand rupees) रुपयांमध्ये, 50 किलोमीटर धावणारी ई- बाईक (bike that runs 50 kilometers) तयार केली आहे. यामुळं पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव माध्यमिक विद्यालयाचे (Thergaon Secondary School) विशेष कौतुक होत आहे. हणमंत सुरवसे असं ई- बाईक साकारणाऱ्या रँचो च नाव आहे. थेरगाव माध्यमिक विद्यालयात ऑटोमोबाईल चे धडे दिले जातात, यातून हणमंतला प्रेरणा मिळाली आणि त्याने ई- बाईक साकारली आहे.
दोन महिन्यात साकारली बाईक : कोरोना काळात हणमंत बसून असायचा आपण काहीतरी करायला हवं, ही जिद्द त्याला शांत बसू देत नव्हती. त्यामुळं तो नवनवीन प्रयोग करायचा. हणमंत हा थेरगाव येथील महानगर पालिकेच्या विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेतो आहे. शाळेत संतोष शेंडगे हे ऑटोमोबाईल प्रशिक्षण देतात. त्यांचं पाठबळ मिळवून हणमंतने काही मुलांना सोबत घेऊन स्क्रॅबचं साहित्य आणलं, त्यामधून ई- बाईक साकारली आहे. 50 किलोमीटर धावणारी ई- बाईक सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. तसेच, इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देतेय. अवघ्या दोन महिन्यात त्याला हे यश मिळालं आहे.