पुणे -एमपीएससी'ची परीक्षा राज्य शासनाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
विद्यार्थी आणि संभाजी ब्रिगेडतर्फे पेढे वाटून आनंद साजरा... हेही वाचा - ..तर एमपीएससी परीक्षा केंद्राला संभाजी ब्रिगेड संरक्षण देईल - प्रवीण गायकवाड
अनेक राजकीय संघटना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही येत्या रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी होती. त्यावर अद्याप काहीही निर्णय होत नव्हता. मात्र, आज मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही परीक्षा Covid-19 च्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुणे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला.
हेही वाचा - मराठा आरक्षण : एक राजा बिनडोक तर दुसऱ्याला इतर विषयांत रस! प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका