महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सारथी संस्थेकडे अडकलेली फेलोशिप जूनमध्ये मिळेल - विनायक मेटे

सारथी संस्थेमार्फत मराठा विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप जून महिन्यात दिली जाईल असे आश्वासन सारथीच्या संचालकांनी दिले आहे.

Vinayak Mete
विनायक मेटे

By

Published : May 24, 2021, 4:47 PM IST

Updated : May 24, 2021, 5:17 PM IST

पुणे -सारथी संस्थेमार्फत मराठा विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप जून महिन्यात दिली जाईल असे आश्वासन सारथीच्या संचालकांनी दिले आहे, अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी दिली, सारथी संस्थेसंदर्भात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. पीएचडी करणारे 241 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. मात्र, गेल्या दीड वर्षापासून या विद्यार्थ्यांना फेलोशिपचा एकही पैसा मिळालेला नाही. दुसरीकडे एमफिल बंद झाल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या मुद्द्यावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सारथी संस्थेत जाऊन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर ते बोलत होते.

माहिती देताना शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे

हेही वाचा -जोडीनं हवेतच बांधली साताजन्माची गाठ; मात्र, नियमांचे उल्लंघन केल्याने डीजीसीएकडून चौकशीचे आदेश

अजित पवारांमुळे सारथीचे काम चांगलं सुरू

अजित पवार यांनी सारथी संस्थेकडे लक्ष दिल्यानंतर आता चांगलं काम होत आहे. सारथी संस्थेला स्वतःची जागा मिळवून देण्याचे काम अजित पवारांनी केले, असे सांगत संस्थेत 41 कर्मचारी-अधिकारी भरण्यास मान्यता देखील देण्यात आल्याचे मेटे म्हणाले. यावेळी मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. मराठा आरक्षण रद्द होण्याबाबत सगळा गाढवपणा हा सरकारने केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे झाले, अशी टीका करत सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, आता मोर्चा हा मुक मोर्चा नसेल, तो बोलका असेल, आम्ही सरकारला सळो की पळो करून सोडणार, असा इशारा मेटे यांनी दिला.

मेटेंची मंत्री वडेट्टीवार यांच्यार टीका

यावेळी मेटे यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली. वडेट्टीवार यांना ओबीसीचा नेता व्हायची घाई झालीये, त्यामुळे ते काहीही बोलत असून, त्यांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही, असे मेटे म्हणाले.

हेही वाचा -योगगुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केली दिलगिरी, वक्तव्य घेतले मागे

Last Updated : May 24, 2021, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details