पुणे :पुण्यात कधी काय होईल, याचा कोणालाही नेम नाही. म्हणतात ना, 'पुणे तिथे काय उणे'. आणि याची प्रचिती ही नेहेमी विविध कार्यातुन येत असते. सध्या पुणे शहर आणि जिल्ह्यात खाद्यपदार्थ आणि हॉटेलचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. हॉटेल चालावी म्हणून कोण काय शक्कल लावेल, याचा काही नेम नसतो. पुण्यातील मावळ तालुक्यातील, कासार साई या भागात, राज्यातील पहिले (States first Sky Dining Hotel) 'स्काय डायनिंग' (Sky Dining Hotel Pune) हॉटेल म्हणून नुकतेच हॉटेल सुरू झाले आहे. या हॉटेलचे वैशिष्टय म्हणजे, या हॉटेलमध्ये जमीन आणि हाॅटेल यांच्या मध्ये; हवेत जाऊन जेवण करता येते. मात्र यावर पुणे पोलीसांनी आक्षेप घेत, व्यवस्थापकाला नोटीस (currently found in the midst of controversy) बजावली आहे.
पुण्यातील मावळ तालुक्यात कासार साई सारखे धरण आणि भोवताली निसर्गरम्य असे वातावरणात आहे. यामध्ये हवेत जाऊन जेवण करण्याचा आनंद सध्या पावसाळी वातावरणात पर्यटक घेत आहे. हे हॉटेल सध्या खवय्यांना चांगलच आकर्षित करत आहे. हे हॉटेल 120 फूट उंचीवर आणि तेही 360 डिग्री व्ह्यूमध्ये तयार करण्यात आले. आणि हेच या हॉटेलच वैशिष्ट्य आहे. हे हॉटेल आकाश जाधव यांनी सुरू केले आहे.
अशी सुचली संकल्पना :सध्या जिल्ह्यात खूप हॉटेल झाले असून, लोकांना आपण नवीन काय देऊ शकतो? याचा विचार मी करत होतो. त्यातच स्काय डायनिंग ही संकल्पना समोर आली. देशभरात स्काय डायनिंगचा आनंद घेण्यास केवळ दोन ठीकाणे होती. जिल्ह्यात ही संकल्पना कुठेही नव्हती. म्हणून ही स्काय डायनिंग संकल्पना मी वास्तवात आणली. यात हवेत 120 फूट पर्यंत जाऊन, नागरिकांना जेवण करण्याचा आनंद घेता येणार आहे.आणि राज्यात अश्या पद्धतीचे पहिलेच हॉटेल सुरू झाली आहे.अशी माहिती यावेळी हाॅटेलचे मालक आकाश जाधव यांनी दिली.
एकाच वेळी 22 जणांना घेता येतो अनुभव :स्काय डायनिंगवर एकच वेळी 22 जण बसतात आणि ते जेव्हा 120 फुटावर वर जातात, तेव्हा तो टेबल 360 डिग्री मध्ये रोटेट होतो.आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच काळजी घेतली जाते.पर्यटकांना बेल्ट लावणे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व माहिती यावेळी दिली जाते. या हॉटेलमध्ये विशेष म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही प्रकार पर्यटकांना खायला मिळतात.