महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bharati Vidyapeeth : राज्य शासनाचे संगीत विद्यापीठ उभारणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख - Bharati Vidyapeeth

राज्यमंत्री डॉ.कदम म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी स्वतः प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालय आणि भारती विद्यापीठ सुरू केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी भारती विद्यापीठाने ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले.

Bharati Vidyapeeth
Bharati Vidyapeeth

By

Published : May 10, 2022, 5:08 PM IST

पुणे :- राज्यात संगीताचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे संगीत विद्यापीठ उभारावयाचे असून त्यासाठी भारती विद्यापीठाने (Bharati Vidyapeeth) सहकार्य करावे , असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले.

अमित देशमुख उपस्थिती
भारती विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापन दिन (Bharati Vidyapeeth) सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषि व सहकार राज्यमंत्री तथा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.विश्वजीत कदम, स्ट्रॅटजिक फोरसाईट ग्रुपचे संदिप वासलेकर, विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, गौर गोपाल दास, आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, कुलगुरु डॉ.माणिकराव साळुंखे, कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप, विजयमाला कदम आदी उपस्थित होते.

भारती विद्यापीठाला वैश्विक स्वरूप
'भारती विद्यापीठाला वैश्विक स्वरूप लाभले आहे. यामागे डॉ. पतंगराव कदम यांची दूरदृष्टी होती. आज जगातील नामांकित विद्यापीठ म्हणून विद्यापीठाची ओळख आहे. विद्यापीठाने साहित्य, संगीत, क्रीडा क्षेत्रात विस्तार करताना सामाजिकता जपली. विद्यापीठाने संगीत शिक्षणाच्या सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. या अनुभवाचा शासनाला उपयोग होईल.' असेही देशमुख म्हणाले.

संगीत विद्यापीठ
मराठवाड्यातही ज्ञानदानाचे कार्य करावे
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणाऱ्या भारती विद्यापीठ सारख्या संस्थांना शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. विद्यापीठाने वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करताना राज्यात आपला विस्तार वाढवावा आणि मराठवाड्यातही ज्ञानदानाचे कार्य सुरू करावे, असे आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात संशोधानासाठी निधी राखून ठेवला जाईल असेही यावेळी देशमुख म्हणाले.
भारती विद्यापीठ
नागरिक घडवण्याचे काम
राज्यमंत्री डॉ.कदम म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी स्वतः प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालय आणि भारती विद्यापीठ सुरू केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी भारती विद्यापीठाने ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन विद्यापीठाने पर्यावरण शास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला. देशाला घडविणारे संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे काम करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -Baby Birth in Railway- पाच वर्षांहून कमी वयाची बालके असणाऱ्या मातांकरिता रेल्वेमध्ये खास 'बेबी बर्थ'

ABOUT THE AUTHOR

...view details