महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 9, 2022, 7:14 PM IST

ETV Bharat / city

Lata Mangeshkar : लतादीदींच्या नावाने राज्य सरकार उभारणार आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय - उदय सामंत यांची घोषणा

भारतरत्न लता स्व. लता मंगेशकर यांच्या नावाने स्मारक उभारण्याची मागणी होत असताना राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकत थेट लता दीदींच्या नावाने संगीत महाविद्यालय ( Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International College of Music ) सुरु करण्याची घोषणा केली आहे. या महाविद्यालयातच त्यांचे स्मारक असणार ( College In Memories Of Lata Mangeshkar ) आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा ( Minister Uday Samant ) केली.

उदय सामंत
उदय सामंत

पुणे : मुंबईत लता मंगेशकर यांच्या नावाने भारत रत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय ( Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International College of Music ) स्थापन करणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी पुण्यात बोलताना केली ( College In Memories Of Lata Mangeshkar ) आहे.

लतादीदींच्या नावाने राज्य सरकार उभारणार आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय - उदय सामंत

भव्य स्मारकही उभारणार

त्याचबरोबर सामंत यांनी लता मंगेशकर यांच्या नावाने एक भव्य स्मारक देखील सरकार उभारणार असल्याचं सांगितलं. हे सगळं मुंबईतील कालिना कॅम्पससमोर ( Kalina Campus Mumbai ) असणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ३ एकर जागेवर उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पुणे विद्यापीठात १४ फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच अनावरण

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले ( Savitribai Phule Pune University ) यांचा पुतळा बसविण्यासाठी सरकार प्रयत्न करत होत. आता येणाऱ्या १४ फेब्रुवारी रोजी या पुतळ्याचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ देखील उपस्थित असणार असून, हा कार्यक्रम ऐतिहासिक असणार असल्याची ग्वाही देखील उदय सामंत यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details