महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Tukaram Supe arrested : टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्यपरीक्षा परिषदेचे आयुक्त सुपे यांच्यासह दोघांना अटक - teacher eligibility test

शिक्षक पात्रता परीक्षेत (teacher eligibility test) पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका असलेले राज्य परीक्षा परिषदेचे (Commissioner of State Examination Council) आयुक्त तुकाराम सुपे (Commissioner Tukaram Supe) याना पोलीसांनी अटक केली आहे. टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्या नंतर सायबर पोलिसांनी (Cyber Police) केलेल्या तपासात सुपे यानी पेपर फुटीला मदत केल्याचे समोर आले होते. त्यांचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही अटक करण्यात आली आहे.

तुकाराम सुपे

By

Published : Dec 17, 2021, 11:28 AM IST

Updated : Dec 17, 2021, 1:01 PM IST

पुणे:टीईटी पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करत मोठी कारवाई केली आहे.

तुकाराम सुपे

सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. नंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली प्रितेश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते आणि धक्कादायक बाब म्हणजे 2021 च्या टीईटी परीक्षेत यातील बरेच विद्यार्थी पात्र असल्याच यादीवरून लक्षात आले होते, हे अपात्र उमेदवार पात्र करण्यात सुपे यांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले होते. कुपे याच्या सोबतच त्यांचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांनाही अटक झाली आहे.

Last Updated : Dec 17, 2021, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details